O piya.... परिणिती-राघवच्या लग्नाचा व्हिडिओ आला समोर; असा होता शाही थाट

Parineeti-Raghav Wedding Video : परिणिती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. शाही थाटात पार पडला सोहळा...

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 29, 2023, 06:24 PM IST
O piya.... परिणिती-राघवच्या लग्नाचा व्हिडिओ आला समोर; असा होता शाही थाट  title=

Pariniti-Raghav Wedding : अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि राघव चड्डा या दोघांच्या लग्नाची खूप जोरदार चर्चा झाली. नुकताच परिणिताने सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अतिशय थाटामाटात हा सोहळा पार पडला. या दोघांचा लग्न सोहळा परिकथेतील लग्नसोहळ्यापेक्षा काही कमी नाही. 

परिणिती चोप्रा आणि राघव चड्डाने 24 सप्टेंबर रोजी उदयपुरच्या लीला पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. या लग्नात बॉलिवूड आणि राजकीय अशा दोन्ही क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. या दोघांच्या लग्नाचे फोटो आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले. या दरम्यान स्वतः परिणिती चोप्राने आपल्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे चाहत्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. 

परिणिती चोप्राने शेअर केला व्हिडीओ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @parineetichopra

लपून छपून पाहिलं नवरदेवाला 

परिणिती चोप्रा स्वतःच्या लग्नात जोरदार मस्ती करताना दिसली. नववधु असलेली परिणिती लपून छपून नवरदेव राघवला पाहताना दिसली. तसेच वरमाळा घालतानाचा खास क्षण देखील सगळ्यांच लक्ष वेधून घेतो. एवढंच नव्हे तर या लग्नसोहळ्यातील भावुक क्षण देखील यामध्ये दाखवण्यात आले आहेत. 

परिणिती-राघवची एंट्री 

या दोघांच्या वेडिंग व्हिडीओची सुरूवात छान लेक लोकेशनने करण्यात आली आहे. यानंतर नवरदेव राघव चड्ढा दिसत आहे. नंतर ब्राइड, ग्रुमचा छान लूक दाखवण्यात आला आहे. दोघं एकमेकांना फ्लाइंग किस देत आहेत. तर दोघांचे अतिशय प्रेमाचे क्षण देखील यामध्ये पाहायला मिळत आहेत.

इथे झाली पहिली भेट 

अनेक रिपोर्टनुसार, या दोघांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली आहे. दोघेही लंडनमध्ये प्रतिष्ठित असलेल्या इंडिया युके अचीवर्स ऑनर्समध्ये पहिल्यांदा भेटले. जेथे या दोघांना आपापल्या क्षेत्रात 'आऊच स्टँडिंग' अचीवर्स म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. या इव्हेंटमधील दोघांचे फोटो समोर आले आणि सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. दोघांनी पण सारखेच कपडे परिधान केले होते.  

लग्नातील असंख्य गोष्टी झाल्या व्हायरल 

परिणिता - राघव या दोघांच्या लग्नातील असंख्य गोष्टी व्हायरल झाल्या. अगदी मेन्यू कार्ड ते लग्नातील दोघांचे क्षण देखील सगळ्यांसमोर आले. दोघांचा किसिंग व्हिडीओ चाहत्यांनी पसंत केला. एवढंच नव्हे तर या व्हिडीओंमधून दोघांची छान केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. परिणिता आणि राघव या दोघांनी आपलं नातं जाहीर केल्यापासून लग्नाची चर्चा होती. अखेर हा सोहळा पार पडला.