'Criminal Justice 3'मध्ये पंकज त्रिपाठी करणार नव्या प्रकरणाचा उलगडा?

'क्रिमिनल जस्टिस: बिहाइंड क्लोज्ड डोर्स’ आणि 'क्रिमिनल जस्टिस 2' सीरिजने प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं.

Updated: Oct 14, 2021, 01:10 PM IST
'Criminal Justice 3'मध्ये पंकज त्रिपाठी करणार नव्या प्रकरणाचा उलगडा? title=

मुंबई : प्रसिद्ध सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'च्या दोन्ही सीझनला चाहत्यांनी चांगलीच पसंत दिली. आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, चाहत्यांचे आवडते माधव मिश्रा  लवकरच त्यांच्या भेटीसाठी येणार आहेत. म्हणजेच पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा  'क्रिमिनल जस्टिस' भाग होणार आहे.  'क्रिमिनल जस्टिस' च्या दुसऱ्या सीझननंतर आता सीरिजच्या तिसऱ्या सीझनची चर्चा सुरू आहे. चाहते तिसऱ्या सीझनच्या प्रतीक्षेत आहेत. 

डिस्ने+ हॉटस्टार स्पेशल 'क्रिमिनल जस्टिस 3' मध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी वकील माधव मिश्राच्या भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या सीझनसंदर्भात, पंकजने म्हटले आहे की, हॉटस्टार स्पेशल क्रिमिनल जस्टिसमध्ये वकील माधव मिश्रा यांच्या पुनरागमनासाठी मी उत्साहित आहे. हे एक पात्र आहे जे मला प्रिय वाटते, कारण या भूमिकेतून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

एवढंच नाही तर यंदाच्या सीझनमध्ये पंकजची भूमिका अधिक तगडी असल्याचं देखली समजत आहे. रिपोर्टनूसार  'क्रिमिनल जस्टिस 3' सीझनच्या शुटिंगची सुरूवात 2022 पासून सुरू होणार आहे. पण सीझनमध्ये पंकजची भूमिका कोणती असेल हे अद्याप कळू शकलेलं नाही.  

'क्रिमिनल जस्टिस: बिहाइंड क्लोज्ड डोर्स’ आणि 'क्रिमिनल जस्टिस 2' सीरिजने प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं. दोन्ही सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक  रोहन सिप्पी आणि अर्जुन मुखर्जी यांच्या खांद्यावर होती. आता 'क्रिमिनल जस्टिस 3' चाहत्यांचं किती मनोरंजन करते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.