'चला हवा येऊ द्या'मध्ये आता पांडू ही करणार कॉमेडी

चला हवा येऊ द्याच्या मंचावर आता सेलिब्रिटी करणार मनोरंजन

Updated: Jun 3, 2019, 03:35 PM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये आता पांडू ही करणार कॉमेडी title=

मुंबई : "इसारलंय", "त्या मला काय माहित?", हे डायलॉग सगळ्यांच्या ओठांवर रुळले आहेत. ज्याच्यामुळे हे डायलॉग्स लोकप्रिय झाले त्या पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुरतडकर आता कॉमेडी करणार आहे. थक्क झालात ना? पण हे खरं आहे.

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं शेलिब्रिटी हे पॅटर्न हे नवीन पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या पर्वात प्रेक्षकांचे लाडके कलाकार कॉमेडी करून त्यांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले आहेत. या पर्वात आता पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुरतडकरची एंट्री होणार आहे. 

Image result for pralhad kurtadkar zee

पांडू ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचं मनोरंजन करतेच. पण प्रल्हाद आता चला हवा येऊ द्याच्या मंचावर कॉमेडी करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. प्रल्हादच्या कॉमेडीची झलक प्रेक्षकांना 'चला हवा येऊ द्या'च्या आगामी भागात पाहायला मिळेल.