'गुरांसारखं वागवतात...', इंडस्ट्रीत सह-कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत 'पंचायत' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

Panchayat 3 Actress Sunita Rajwar : पंचायत फेम अभिनेत्री सुनीता राजवारनं इंडस्ट्रीमध्ये मिळणाऱ्या वागणुकीवर मोठा खुलासा

दिक्षा पाटील | Updated: May 24, 2024, 01:00 PM IST
'गुरांसारखं वागवतात...', इंडस्ट्रीत सह-कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत 'पंचायत' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Panchayat 3 Actress Sunita Rajwar  सध्या सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष हे अ‍ॅमेझॉन प्राइमवर येणाऱ्या 'पंचायत 3' या सीरिजनं वेधलं आहे. या वेब सीरजच्या 3 भागाची जेव्हा पासून घोषणा करण्यात आली आहे तेव्हा पासून प्रेक्षकांमध्ये एक आतुरता लागली आहे. याच वेब सीरिजमध्ये असलेली अभिनेत्री सुनीता राजवारनं इंडस्ट्रीमध्ये आर्टिस्टसोबत कशी वागणूक मिळते याचा खुलासा केला आहे. या इंडस्ट्रीमध्ये आर्टिस्टला खूप काही सहन करावं लागतं. मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला राजासारखी वागणूक मिळते तर सह-कलाकारांकडे कोणी लक्ष देत नाही. याविषयी बोलताना सुनीता राजवारनं सांगितलं की छोट्या भूमिका असलेल्या कलाकारांना गुरांसारखं वागणूक मिळते. 

सुनीता राजवारनं कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 दरम्यान ब्रूट इंडियाशी चर्चा केली. तर सुनीता कान्स 2024 मध्ये 'संतोष' या तिच्या चित्रपटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पोहोचली होती. इंडस्ट्रीविषयी बोलताना सुनीतानं सांगितलं की इंडस्ट्री ही जास्त कलाकारांना टाइपकास्ट करते कारण निर्मात्यांना त्यांना चित्रपटात घेणं सोप होतं. अनेकदा कलाकार या गोष्टीचा स्वीकार करतात कारण त्यांना त्यांचं पोट भरायचं असतं आणि त्यामुळेच ते कोणतीही तक्रार करु शकत नाही. याविषयी बोलताना सुनीता राजवार म्हणाली 'हे भयानक आहे पण सत्य आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुनीता राजवारनं या मुलाखतीत मुख्य कलाकार आणि सह-कलाकारांमध्ये होणाऱ्या भेदभावाविषयी वक्तव्य केलं आहे. तिनं सांगितलं की मुख्य कलाकारांना सगळ्या सुविधा देण्यात येतात तर सह-कलाकारांना प्रत्येक गोष्टीसाठी हात पसरवावे लागतात. सुनीतानं सांगितलं की 'मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना त्यांची इच्छा आणि सोयीनुसार कॉल टाईम देण्यात येतो. तिनं पुढे हे देखील सांगितलं की मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना 30 दिवस काम करावं लागतं आणि कधी-कधी त्यांना संपूर्ण 24 तास काम करावं लागतं. पण दुसऱ्यासोबत होणारा हा भेदभाव तिला हीन वाटतं.'

शूटला कोणत्याही वेळी बोलवतात

सुनीतानं पुढे शूटवर कोणत्याही वेळी बोलण्याविषयी म्हणाली, 'जर तुम्हाला माहित आहे की ते कोणत्या आर्टिस्टसोबत शूट करणार नाही, तर त्यांना नंतर बोलवा. त्यांना पूर्णवेळ बसवणून ठेवण्याची काय गरज. हे असं आहे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीला तुच्छ लेखण्यासाठी किंवा हीन असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहात.' 

सुनीतानं पुढे टीव्ही सेटवर एकंदरीत कसं वातावरण असतं याविषयी सांगितलं. 'मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे लाड करण्यात येतात. त्यांचे रूम साफ असतात, त्याच्यांकडे फ्रिज असेल, मायक्रोवेव असेल. तर आमच्या सारख्यांना एक छोटी खोली देण्यात येते. तिथे 3-4 लोकांना बसवून ठेवतात. त्याचं छप्पर तुटलेलं असतं. बाथरुम साफ नसतात. बेडशीट खराब असते. हे सगळं पाहून मला कायम वाईट वाटतं.' 

सुनीतानं पुढे अभिनय सोडण्याच्या निर्णयाचं कारण सांगितलं. त्यासोबत तिनं CINTAA कार्ड देखील कॅन्सल केलं होतं. सुनीतानं सांगितलं की 'जेव्हा तुम्ही छोटे रोल करतात तेव्हा तुम्हाला आदर मिळत नाही. तुम्हाला चांगले पैसे मिळत नाही. तुमच्यासोबत प्राण्यांसारखी वागणूक दिली जाते, तर ही हृदय पिळवटणारी गोष्ट आहे.'

हेही वाचा : मोदी पुन्हा निवडूण येतील का? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत श्रेयस तळपदे म्हणाला, ' माझ्या मते ते...'

सुनीता राजवारही लवकरच 'पंचायत 3' मध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये तिची क्रांती देवी ही भूमिका आहे. क्रांती देवी ही बनराकसची पत्नी असते. क्रांती आणि बनराकस मिळून प्रधानजी आणि मंजू देवी यांना पाडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. तर ही सीरिज 28 मे रोजी प्राइम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे.