सैफचा मुलगा इब्राहिम अभिनेत्रीला करतोय डेट?..अभिनेत्रीला आली तोंड लपवायची वेळ

मुंबईः बॉलिवूड स्टार किड्स नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. बॉलिवूड स्टार आणि नवाब सैफ अली खान आता चर्चेत आलाय त्याचा मुलगा इब्राहिम खानमुळे. दिसायला सैफची सेम टू सेम कॉपी असणारा इब्राहिम नुकताच एका मुलीसोबत कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Updated: Apr 20, 2022, 03:24 PM IST
सैफचा मुलगा इब्राहिम अभिनेत्रीला करतोय डेट?..अभिनेत्रीला आली तोंड लपवायची वेळ title=

मुंबईः बॉलिवूड स्टार किड्स नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. बॉलिवूड स्टार आणि नवाब सैफ अली खान आता चर्चेत आलाय त्याचा मुलगा इब्राहिम खानमुळे. दिसायला सैफची सेम टू सेम कॉपी असणारा इब्राहिम नुकताच एका मुलीसोबत कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कारमध्ये एका मुलीसोबत बसलेला इब्राहिम कॅमेरासमोर बिनधास्त लूक देत आहे. मात्र इब्राहिमसोबत असणारी मुलगी चेहरा झाकताना दिसून आली. त्यामुळे ही मुलगी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ही मुलगी पलक तिवारी असल्याचं समजतंय...पलक तिवारी ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. लवकरच पलक बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.पलक आपल्या ग्लॅमरस लूकने नेहमीच चर्चेत असते मात्र आता इब्राहिमसोबतच्या नात्यांवरून ही चर्चेत आली आहे. 

इब्राहिमसोबत कारमध्ये बसलेल्या पलकने चेहरा लपवल्याचं दिसलं, यावर तिला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आई श्वेतामुळे चेहरा लपवल्याचं कारण पलकने दिलं. आईला आपण ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं सांगितलं होतं.

मात्र कॅमेऱ्यामध्ये पकडले गेल्याने चेहरा लपवला असं पलक सांगते, तसंच इब्राहिमसोबतच्या नात्यावर तिने मौन सोडलंय...इब्राहिम आपला चांगला मित्र असल्याचं पलकने म्हटलं आहे.