पलक तिवारी-इब्राहिम अली खानचं नक्की चाललंय काय? पार्टीत पुन्हा एकदा दिसले एकत्र

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान पुन्हा एकदा सोबत दिसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची चर्चा आहे.

Updated: May 8, 2022, 11:30 AM IST
पलक तिवारी-इब्राहिम अली खानचं नक्की चाललंय काय? पार्टीत पुन्हा एकदा दिसले एकत्र title=

मुंबईः टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम पुन्हा एकदा सोबत दिसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांची चर्चा आहे. यापूर्वीही ते दोघे एकत्र दिसल्याने दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

आई श्वेताप्रमाणेच पलक देखील मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे. लवकरच तिचा बॉलिवूड चित्रपट ‘रोझी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, अभिनेत्री आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच पलकला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसोबत स्पॉट करण्यात आलं. दोघेही सोबत दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शनिवारी रात्री मित्र-मैत्रिणींसोबत दोघं एका पार्टीत एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्या वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. काही महिन्यांपूर्वीदेखील इब्राहिम आणि पलक एकत्र स्पॉट झाले होते. मात्र, तेव्हा ते एकाच वेळी, एकाच ठिकाणी वेगवेगळे दिसले होते. यावेळी मात्र, दोघेही एकाच गाडीतून आले अन् एकाच गाडीतून घरी गेले.

यावेळी पलक तिवारीने मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून लपण्याचा खूप प्रयत्न केला होता. मुंबईतील एका प्रसिद्ध फूड जॉइंटमधून बाहेर पडताना हे दोघे स्पॉट झाले आहेत. दोघेही एकत्र दिसल्यानंतर ते डिनर डेटला गेले होते का?, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. 

इब्राहिम आणि पलकला त्यांच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना पलक म्हणाली की, ‘आम्ही फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्हीच नाही तर, आमच्यासोबत आमची फ्रेंड्स गँगदेखील तिथे होती. मात्र, मीडियाला फक्त आम्ही दिसलो आणि आता चर्चेत आलो. इब्राहिम खूप चांगला मित्र आहे असं तिनं म्हटलंय