तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत असणाऱ्या आमिर खानबाबत पाकिस्तानी अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

आमिर खान सध्या तिसर्‍या लग्नाच्या बातम्यांनी चर्चेत आहे. 

Updated: Nov 23, 2021, 02:06 PM IST
तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत असणाऱ्या आमिर खानबाबत पाकिस्तानी अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : टेलिव्हिजन शो "जिंदगी गुलजार है" द्वारे जागतिक स्तरावर स्वत:ची ओळख मिळवणारी पाकिस्तानी अभिनेत्री सनम सईद म्हणाली की, तिला भारतीय चित्रपटांमध्येही अभिनय करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर तिला बॉलिवूड स्टार आमिर खानसोबत काम करायला आवडेल. सनमने तिच्या आगामी शो 'कातिल हसीनो के नाम' च्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, मी भारतीय चित्रपटांमध्ये काम करायला तयार आहे. पण टेलिव्हिजनमध्ये नाही. मला सीमेच्या या बाजूला टीव्ही आवडतो. मला अनेक प्रकारचे चित्रपट करायचे आहेत.

"पण सुरुवातीला, आमिर खानसोबत काम करायला मला आवडेल." OTT वरील पाकिस्तानी कंटेंटच्या भारतातील लोकप्रियतेबद्दल बोलताना सनम म्हणाली की, आम्ही भारतीय चित्रपट पाहिले आहेत. पण आम्ही कसे दिसतो आणि आमचं जीवन कसं आहे हे त्यांना माहित नव्हतं. म्हणूनच. यासाठीच हे त्यांचे डोळे उघडण्यासारखंच आहे. आम्ही एकसारखे दिसतो, सारखेच खातो, आम्ही व्यावहारिकदृष्ट्या भावंडे आहोत.

ती पुढे म्हणाली की, मला माहित आहे की, पाकिस्तानी आमच्यासारखे दिसतात, आमच्यासारखे बोलतात, उर्दूमध्ये थोडं चांगले बोलतात. OTT प्लॅटफॉर्मने आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. जिथे निर्बंध आणि राजकारण सगळं वेगळं आहेत आणि आम्ही आमच्या शोद्वारे भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

अभिनेत्रीने असंही नमूद केलं की, 'कातिल हसीनो के नाम' मधील तिची भूमिका वास्तविक जीवनात ती ज्या प्रकारची आहे त्यापेक्षा खूप वेगळी आहे. "मला खऱ्या आयुष्यात सहज राग येत नाही, पण जेव्हा मी एखादी भूमिका करते तेव्हा त्या भावना आणायच्या असतात. एक अभिनेता असण्याचं सौंदर्य माझ्या पात्रांमधून व्यक्त होणं हे आहे. मी एक अतिशय साधी मुलगी आहे."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आमिर खान सध्या तिसर्‍या लग्नाच्या बातम्यांनी चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असा दावा केला जात आहे की, आमिर खान लवकरच तिसरं लग्न करू शकतो. आमिर हे तिसरं लग्न कोणासोबत प्लॅन करत आहे हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी आमिर खान त्याच्या को-स्टार्ससोबत या लग्नाची योजना आखत असल्याचं वृत्त नक्कीच बोललं जात आहे. आता या अभिनेत्रीचं नाव जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.