मुंबई : 25 जानेवारी रोजी राजस्थानच्या जयपुरमध्ये जी जयपुर लिटरेचर फेस्टिवल.
या दिवशी अनेक बॉलिवूड मंडळी उपस्थित होते. शुक्रवारी फिल्ममेकर विशाल भारद्वाज देखील या कार्यक्रमाचा भाग बनले. तेव्हा पद्मावत सिनेमाबद्दल बोलताना ते म्हणाले की, जे झालं ते खरंच अगदी दुर्भाग्यपूर्ण आहे. इंडस्ट्रीतील व्यक्ती म्हणून आम्ही खूप निराश आणि दुःखी आहोत. मला आशा आहे की, राज्याच्या सरकारने यावर कठोर कारवाई करायला हवी.
पीटीआयच्या माहितीनुसार, पद्मावत या सिनेमाला सेंसर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदिल मिळाला असूनही ही या विरोध करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई कशी होत नाही. हैदर, ओमकार सारखे सिनेमे बनवलेले विशाल भारद्वाज यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्ट आणि सेंसर बोर्डाने मंजुरी दिल्यावर काय समस्या आहे?
काल गुरूवारी करणी सेनेच्या चित्तोडगड युनिटने भन्साळींच्या आईच्या नावावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली. आम्ही ‘पद्मावत’च्या विरोधात भन्साळींच्या आईच्या नावावर चित्रपट आणू, असे करणी सेनेच्या चित्तोडगड युनिटचे जिल्हा अध्यक्ष गोविंद सिंह खंगरोट यांनी म्हटले. चित्रपटाचे नाव ‘लीला की लीला’ ठेवण्यात आले असून सध्या याच्या कथेवर काम सुरु आहे. वर्षभरात हा चित्रपट बनून पूर्ण होईल, अशी आमची अपेक्षा आहे. या चित्रपटावर भन्साळींना अभिमान असेल, असे उपरोधिकपणे ते म्हणाले. करणी सेनेचा कार्यकर्ता अरविंद व्यास याच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. या चित्रपटानंतर भन्साळींना महिलेचा अपमान काय असतो, ते कळेल, असे अरविंद व्यास म्हणाले.