VIDEO : अरिजीतच्या आवाजातलं 'बिन्ते दिल'... रणवीरचा भेसूर अंदाज

'खलीबली'नंतर आता संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमातलं आणखी एक प्रदर्शित झालंय. 

Updated: Feb 2, 2018, 04:25 PM IST
VIDEO : अरिजीतच्या आवाजातलं 'बिन्ते दिल'... रणवीरचा भेसूर अंदाज   title=

मुंबई : 'खलीबली'नंतर आता संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमातलं आणखी एक प्रदर्शित झालंय. 

स्वत:वर प्रचंड प्रेम करणाऱ्या अलाउद्दीन खिलच्या भूमिकेतला रणवीर 'बिन्ते दिल मिसिरया में' या गाण्यात भलताच मादक दिसलाय. 

मलिक कफूरच्या भूमिकेतला जिम सारभनंही उत्तम प्रदर्शन केलंय. जिम सारभ यापूर्वी सोनम कपूच्या 'नीरजा' सिनेमातही एका दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसलाय. 

हे गाणं ए एम तुराज यांनी लिहिलंय... तर भन्साळी यांनी हे कंपोज केलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, सध्याच्या ट्रेन्डनुसार सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी सिनेमातील गाणे प्रदर्शित केले जातात... 'पद्मावत'नं मात्र याहून अगदी उलट केलंय. 'पद्मावत' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता या सिनेमातली गाणी प्रदर्शित केली जात आहेत.