इंदौर : संजय लीला भंसाळींचा बहुप्रतिक्षित आणि अनेक वादविवादांमध्ये अडकलेला 'पद्मावत' हा सिनेमा देशापरदेशामध्ये रसिकांच्या पसंतीला उतरला आहे.
200 कोटींचा पल्ला पार केलेला हा चित्रपट देशात अजूनही काही राज्यांमध्ये प्रदर्शित झालेला नाही.
'पद्मावत' या आठवड्यात मध्यप्रदेशात रिलीज होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेश सरकारने सिनेमाच्या वितरकांना, सिनेमाघरांना पुरेशी सुरक्षा देणार असल्याचे सांगितले आहे. 'पद्मावत' पाहून SRK रणवीरला म्हणाला ....
इंदौरमध्ये 8 फेब्रुवारीला पद्मावत रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचार्यांनी आवश्यक पोलिस सुरक्षा व्यवस्था देण्याचे काबुल केले आहे. शानदार नृत्याचा अविष्कार; घूमर गाण्यावर तरूणीचा ठेका
पद्मावत चित्रपटाला विरोध करताना राजपुत संघटनांसोबत करणी सेनादेखील आघाडीवर होती. मात्र देशात इतरत्र विरोध मावळल्यानंतर आता मध्यप्रदेशातही करणी सेना शांततापूर्ण मार्गाने विरोध करणार आहे. सिनेमागृहांच्या बाहेर दर्शकांना हात जोडून चित्रपट पहायला न जाण्याचे आवाहनही केले जाईल असे करणी सेनेचे प्रभारी रघू परमार यांनी सांगितले आहे. VIDEO : अरिजीतच्या आवाजातलं 'बिन्ते दिल'... रणवीरचा भेसूर अंदाज