Oscars 2023: भारतात कधी, केव्हा आणि कसा बघाल 95th ऑस्कर अवॉर्ड सोहळा, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर..

95th Oscars 2023 Date: ऑस्कर अकादमी पुरस्कार हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. त्यामुळे कलाकारांसाठी त्याचा आयुष्यात मोलाचा पुरस्कार...जणू काही  कारकिर्दीचं शिखर गाठण्याचा अनुभव...असा हा यंदाचा ऑस्कर 2023 अवघ्या काही तासांवर आला आहे. 

Updated: Mar 12, 2023, 01:16 AM IST
Oscars 2023: भारतात कधी, केव्हा आणि कसा बघाल 95th ऑस्कर अवॉर्ड सोहळा, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर..  title=
Oscars 2023 date time and where to watch in India rrr nominations Deepika Padukone everything in marathi

95th Academy Awards 2023 Date and Time: बॉलिवूड, टॉलीवूडपासून & हॉलिवूडमधील दिग्दर्शक, कलाकार, निमार्त्यापासून प्रत्येक क्षण ज्या क्षणाची वाट पाहत आहे...तो अवघ्या काही तासांवर आला आहे. यंदाचं 2023 ऑस्करचं हे 95 वं वर्ष (95th Oscar Awards)आहे. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रत्येक कलाकार मेहनत करत असतो. ज्या चित्रपटाला, कलाकाराला हा पुरस्कार मिळतो त्याचा कामाला जगभरात कौतुक केलं जातं. यंदा भारतीयांसाठी हा सोहळा खूप खास असणार आहे. कारण भारतीय चित्रपटांनाही तीन नामांकने मिळाली आहेत. तर दीपिका पादुकोणला मोठा बहुमान मिळाला आहे. दीपिका यंदा पुरस्कार प्रदान करणार आहे.

भारतात कुठे आणि कधी पाहता येणार ? (When and where to watch the Oscars 2023 live in India?)

95 व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा 12 मार्च 2023 (12 March 2023) ला होणार आहे.  लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहेत . तर हा सोहळा भारतात  13 मार्च ला (13 March 2023) भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30 वाजतेपासून पाहता येणार आहे. भारतीयांना हा सोहळा डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह-स्ट्रीम (Live-stream on Disney Plus Hotstar) पाहता येणार आहे. 

भारताच्या 'या' सिनेमांचा ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत (Indian Film Oscar Nominations 2023)

'ऑस्कर नामांकन 2023' (Oscar Nominations 2023) भारतासाठी खूपच खास असणार आहे. भारताला या वर्षी तीन अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले आहे. यात राजामौलींच्या (Rajamouli) आरआरआर (RRR) 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) या समावेश आहे. SS राजामौली यांच्या RRR मधील "नातू नातू" ला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. 

ऑस्कर 2023 समारंभात हे देणार पुरस्कार (Oscar Awards 2023 Reprenter List)

 95 व्या ऑस्कर समारंभात दीपिका पदुकोण, एमिली ब्लंट, राईस अहमद, ड्वेन जॉन्सन, ग्लेन क्लोज, एरियाना डीबोस, सॅम्युअल एल जॅक्सन, जेनिफर कोनेली, मायकेल बी. जॉर्डन, जोनाथन मेजर्स, ट्रॉय कोटसुर, मेलिसा मॅककार्थी, जेनेल मोने, क्वेस्टलोव्ह, जो साल्दा देणार आहेत. (Oscars 2023 date time and where to watch in India rrr nominations Deepika Padukone everything in marathi)

यंदा सूत्रसंचलनाची जबाबदारी कोणावर? 

गेल्या वेळेप्रमाणे यावेळी ऑस्कर सोहळ्यात तीन सूत्रसंचालक नसतील. गेल्या वर्षी, रेजिना हॉल, एमी शुमर आणि वांडा सायक्स यांनी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले होते, तर यावेळी, कॉमेडियन जिमी किमेल पुन्हा शोचे सूत्रसंचालन करणार आहेत. त्याचे थप्पड प्रकरण आजही चाहत्यांच्या मनात ताजे आहे.

 

या कलाकारांचे असणार परफॉर्मन्स 

रिहाना 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर' मधून 'लिफ्ट मी अप' सादर करेल. लेडी गागा 'टॉप गन: मॅव्हरिक' मधील 'होल्ड माय हँड'वर परफॉर्मन्स देणार आहे.  'झलक दिखला जा'च्या सहाव्या सीझनमध्ये उपविजेती आणि अमेरिकन डान्सर Lauren Gottlieb 'RRR' च्या 'नाटू नातू'वर थिरकरणार आहे. 

त्यामुळे या सोहळ्याची भारतीयांमध्ये खूप उत्सुकता आहे. काही तासांवर आलेला हा सोहळा यंदा कोण नाव कोरले हे लवकरच स्पष्ट होईल.