थाट इटलीत, जीव वडापावमध्ये... अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील Inside Video व्हायरल; Egg Rolls चाही समावेश

Ambani's Portofino Pre-wedding Festivities Had Vada Pav and Egg Roll For Guests : अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात वडापावनं वेधलं लक्ष

दिक्षा पाटील | Updated: Jul 11, 2024, 11:29 AM IST
थाट इटलीत, जीव वडापावमध्ये... अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील Inside Video व्हायरल; Egg Rolls चाही समावेश title=
(Photo Credit : Social Media)

Ambani's Portofino Pre-wedding Festivities Had Vada Pav and Egg Roll For Guests : गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. उद्या म्हणजेच 12 जुलै रोजी ते लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या सगळ्या विधी या सुरु झाल्या आहेत. त्याच्या आधी 29 मे आणि 2 जून रोजी त्यांनी प्री-वेडिंग पार्टिचे आयोजन केले होते. 29 मे रोजी जामनगरमध्ये त्यांचं एक प्री-वेडिंग झालं आणि त्यानंतर 2 जूननंतर क्रुझवर त्यांचा दुसरा प्री-वेडिंग कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या ऑरीनं देखील हजेरी लावली होती. त्यानं नुकताच तिथला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यानं तिथे काय काय खायला होतं ते दाखवलं आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्लॉगमध्ये ऑरीनं सगळे फूड स्टॉल दाखवले आहेत. त्याशिवाय त्यानं प्रत्येक फूट स्टॉलवर जाऊन तिथल्या वेगवेगळ्या डिश चाखून पाहिल्या आहेत. सुरुवातीला त्यानं चीज बॉल्स, पास्ता आणि इतर काही पदार्थांचे सेवन केले. यावेळी त्याच्यासोबत त्याची मैत्रीण तानिया श्रॉफ देखील होती. त्यांनी यावेळी वेगवेगळे पदार्थ खाल्ले त्यापैकी एक हा मनाली रोल (एक सॉफ्ट पराठा ज्यात अंड आणि मसाला चिप्स असतात) हे ट्राय केलं. हे त्यांना लेजच्या पाकिटात सर्व्ह करण्यात आलं. अखेर ते एका फूड स्टॉलवर गेले. जिथे वडा पाव होता. त्याला पाहून ऑरी म्हणाला की ‘पोर्तोफिनोमधील सर्वोत्कृष्ट वडापाव’. त्यानं लगेच त्याची चव घेतली आणि तो वडापाव किती टेस्टी होता हे त्याच्या चेहऱ्यावर असणाऱ्या हावभावांवरून दिसतंय. परदेशात कार्यक्रम ठेवला असला तरी अंबानी कुटुंब हे वडापाव विसरलेले नाही. तिथेही त्यांनी मुंबईचा वडापाव हा फुड स्टॉलवर ठेवल्यानं. या गोष्टीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 
 

orry shares video from Ambani s Portofino pre-wedding festivities had vada pav egg roll for guests

Inside Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

हेही वाचा : 'करवाचौथ'च्याच दिवशी कतरिनाची फसवणूक? खुद्द विकी कौशलनंच केला खुलासा

दरम्यान, अंबानींच्या पहिल्या प्री-वेडिंग विषयी बोलायचे झाले. जामनगरमध्ये तीन दिवसांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांचा परफॉर्मन्स होता. त्याशिवाय रिहानानं इथं परफॉर्म देखील केलं होतं. रिहाना व्यतिरिक्त दिलजीत दोसांझ आणि एकॉननं देखील परफॉर्म केलं होतं.  क्रुझनं फ्रान्स आणि इटलीमध्ये झालेल्या दुसऱ्या प्री-वेडिंगमधअये बॅकस्ट्रीट बॉईज आणि केटी पेरीनं परर्फॉर्म केलं होतं. तर लग्नाच्या संगीत कार्यक्रमात जस्टिन बिबरनं परफॉर्म केलं होतं.