मुंबई : बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोीघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. दीपिका - रणवीर हे दोघे 14-15 नोव्हेंबरला लग्न करणार आहे.
या दोघांच्या लग्नाच्या वेन्यूबाबत अजून खूप संभ्रम आहे. हे लग्न नेमकं कुठे होणार हे अद्याप कळलेलं नाही. पण या लग्नाला फक्त बॉलिवूडमधील 4 महत्वाचे कलाकार सहभागी होणार आहेत. बाकीच्या कलाकारांना रिसेप्शनला बोलवण्यात आलं आहे.
या लग्नाला बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान, फराह खान, आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साळी असे 4 कलाकार उपस्थित राहणार आहे. आपल्याला माहितच आहे शाहरूख खान आणि दीपिका यांच खूप चांगल बॉन्डिंग आहे. फराह खानने दीपिकाला बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. तर फिल्ममेकर संजय लीला भन्साळीने या कपलला आपल्या सिनेमातून ओळख दिली आहे. तर आदित्य चोप्रा यांनी रणवीर सिंहला लाँच केलं आहे.
दीपिका - रणवीरने लग्नाची घोषणा करता लिहीलं होतं की,आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, आमच्या कुटुंबियांच्या आशिर्वादाने 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 रोजी आमचं लग्न निश्चित झालं आहे. दीपिका -रणवीर पुढे लिहितात की, एवढे वर्ष आम्हाला जे प्रेम आणि स्नेह मिळाला त्याकरता आम्ही आभारी आहोत.
या लग्नसंमारंभाला येणाऱ्या पाहुण्यांना मोबाइल आणण्यास मनाई आहे. यावरून हे दोन्ही कलाकार आपल्या लग्नाला खूप खाजगी ठेवण्याचा विचार करत असल्याचं समजत आहे. तर दीपिकाच्या लग्नाच्या कपड्यांची तयारी सब्यसाची मुखर्जी करणार आहे.