'पण मी अंकिता वालावलकरचा...', क्रशबद्दल विचारताच ओंकार भोजनेचा खुलासा

Onkar Bhojane : ओंकार भोजने सध्या ‘करुन गेलो गाव’ या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत ओंकारनं खुलासा केला की त्याला कोकण हार्टेड गर्ल आवडते. तिच्या रिल्सचा तो चाहता आहे. दरम्यान, कोकण हार्टेड गर्ल ही तिच्या जबरदस्त रील्स आणि व्हिडीओसाठी ओळखली जाते. 

Updated: Apr 23, 2023, 10:11 AM IST
'पण मी अंकिता वालावलकरचा...', क्रशबद्दल विचारताच ओंकार भोजनेचा खुलासा title=
(Photo Credit : Onkar Bhojane/ kokan hearted girl Instagram)

Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) सतत चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून ओंकार भोजने हा त्याच्या ‘करुन गेलो गाव’ या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकानंतर ओंकारचं सगळीकडे कौतुक होत आहे. अशात एका मुलाखतीत ओंकारनं त्याला कोणत्या सेलिब्रिटीवर क्रश आहे किंवा आवडते याचा खुलासा केला आहे. यावेळी ओंकारनं सांगितलं की त्याला कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ही आवडते. 

ओंकार भोजनेनं नुकतीच त्याच्या या नाटकानिमित्तानं ‘सकाळ’ च्या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ओंकारला त्याच्या क्रशविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत माझी अशी कोणी क्रश नाही. पण कोकण हार्टेड गर्ल आवडते असा खुलासा त्यानं केला. याविषयी बोलताना ओंकार म्हणाला, माझी अशी कोणी क्रश नाही. पण कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा मी चाहता आहे. ती एक अप्रतिम इन्स्टाग्राम स्टार असून बिनधास्त बेधडक अशी मराठी मुलगी आहे. ती माझी क्रश नाही, पण मी तिला फॉलो करतो. ती जसे रिल्स बनवते ते मला आवडतात. इतकंच काय तर ती बिनधास्तपणे कोणत्याही एखाद्या सामाजिक विषयावर बोलते, ते मला आवडतं. तिचं काम मला आवडतं. प्रेम वगैरेच्या भानगडीत मी पडत नाही असं ओंकार म्हणाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ओंकारच्या ‘करुन गेलो गाव’ या नाटका विषयी बोलायचे झाले तर या नाटकात त्याच्यासोबत 'चला हवा येऊद्या' (Chala Hawa Yeu Dya)  फेम विनोद वीर भाऊ कदम (Bhau Kadam) देखील दिसत आहे. या दोन विनोद वीरांना एका मंचावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. मात्र, आता नाटक पाहायला मिळत असताना त्या दोघांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. या नाटकाची निर्मिती ही दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि राहुल भंडारे (Rahul Bhandare) करणार आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेश देशपांडे (Rajesh Deshpande) यांनी केले आहे. 

हेही वाचा : VIDEO : अंकुश चौधरीनं शाहीर साबळे यांच्या भूमिकेसाठी केली अशी तयारी

दरम्यान, ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा त्याचा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर आता तो लवकरच ‘कलावती’ नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. आता ओंकारच्या चाहत्यांविषयी बोलायचे झाले तर जेव्हा त्यानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमेडी शोचा निरोप घेतला, त्यानंतर त्याच्या चाहत्यांना फार वाईट वाटलं होतं. पण आता त्याला पुन्हा एकदा अभिनय करताना पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.