'Taarak Mehta...' मालिकेत बबीताला टक्कर देण्यासाठी अत्यंत बोल्ड अभिनेत्रीची एन्ट्री

कोण आहे ती अभिनेत्री?  

Updated: Jan 16, 2022, 12:16 PM IST
'Taarak Mehta...' मालिकेत बबीताला टक्कर देण्यासाठी अत्यंत बोल्ड अभिनेत्रीची एन्ट्री title=

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)ने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. मालिका गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेच्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. आता शोमध्ये एका बोल्ड आणि हॉट अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. या हॉट अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री झाली तर बबीतासाठी  'काँटे की टक्कर' असेल. असं म्हणायला हरकत नाही. 

तारक मेहतामध्ये एकापेक्षा सुंदर अभिनेत्री आहेत. बबीताजी, अंजली भाभीच्या बोल्डनेसची सोशल मीडियावरही चर्चा आहे. दरम्यान, या शोमध्ये एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. अर्शी भारती असं त्या नव्या अभिनेत्रीचं नाव आहे. 

अर्शीने तारक मेहताच्या बॉसची सेक्रेटरी म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे. अर्शी मूळची जमशेदपूरची असून अर्शीचे पूर्ण नाव अर्शी भारती शांडिल्य आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत एंट्री करण्यापूर्वी अर्शी प्रसिद्ध चित्रपटात झळकली होती. अर्शी आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानिपत'  चित्रपटात दिसली होती.

आता अर्शी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अर्शी सोशल मीडियावर देखील तुफान ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.