Bigg Boss 15: तेजस्वीचा सिक्रेट बॉयफ्रेंड समोर, मग करण कुंद्राला देतेय धोका!

सिक्रेट बॉयफ्रेंडकडून अखेर सत्य उघड  

Updated: Jan 16, 2022, 11:25 AM IST
 Bigg Boss 15: तेजस्वीचा सिक्रेट बॉयफ्रेंड समोर, मग करण कुंद्राला देतेय धोका! title=

मुंबई : सध्या 'बिग बॉस 15'ची चर्चा तुफान रंगत आहे. भांडण, मैत्री, प्रेम, गटबाजी या सर्व गोष्टी ज्याठिाकणी अनुभवायला मिळतात ते ठिकाण म्हणजे बिग बॉसचं घर. बिग बॉसच्या यंदाच्या भागात प्रेमाचं गुलाब बहरत आहे, अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांच्यात. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. अशात दोघांमध्ये एका सिक्रेट व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. तेजस्वी शोमधून बाहेर होताचं तिच्या सिक्रेट बॉयफ्रेंडबद्दल चर्चा रंगत आहे. 

तेजस्वीच्या आयुष्यातील सिक्रेट व्यक्ती दुसरी तिसरी कोणीनसून तेजस्वीचा सिक्रेट बॉयफ्रेंड असल्याचं समोर येत आहे.  ETimes च्या रिपोर्ट्सनुसार, तेजस्वीचा एक बॉयफ्रेंड आहे. त्याचं नाव क्रिश खेडेकर आहे, ज्याला तेजस्वी डेट करत असल्याचं समजत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यामुळे तेजस्वी करणला धोका देत आहे का? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला. कारण तेजस्वीने शोमध्ये एकदा तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं होतं. पण रंगणाऱ्या चर्चांना खुद्द क्रिश खेडेकर पूर्णविराम दिला आहे. 

क्रिश खेडेकरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने तेजस्वी आणि मी एकमेकांना डेट करत नसल्याचं सांगितलं आहे.  शिवाय त्याने अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील सांगितलं आहे.