झोपडपट्टीतील महिलेनं अबरामला जबराम हाक मारताच, शाहरुखची अनपेक्षित Reaction

Shah Rukh Khan AbRam Name : शाहरुखच्या लाडक्या लेकाला जबराम म्हणून महिलेनं हाक मारताच शाहरुखनं केलं होतं असं रिअॅक्ट तुम्हाला ही होईल आश्चर्य

दिक्षा पाटील | Updated: Nov 2, 2023, 11:04 AM IST
झोपडपट्टीतील महिलेनं अबरामला जबराम हाक मारताच, शाहरुखची अनपेक्षित Reaction  title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan AbRam Name : आपल्या दर्जेदार अभिनयातून सगळ्यांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आहे. शाहरुखचा आज 58 वा वाढदिवस आहे. तर शाहरुखची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्याचा आज वाढदिवस असून त्याची एक झलक मिळावी म्हणून त्याचे चाहते काल रात्री मन्नतच्या बाहेर अनेक तास उभे होते. मोजता न येणाऱ्या संख्येत त्याच्या चाहत्यांनी तिथे गर्दी केली होती. शाहरुख आणि त्याच्या कुटुंबातील अनेक गोष्टी जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांना इच्छा असते. त्यात त्याची मुलं देखील आहेत. त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सगळ्यांना माहित आहे. त्याच्या मुलांची नावं, ते काय करतात वगैरे वगैरे. पण तुम्हाला माहितीये इतकी लोकप्रियता असताना जेव्हा अबरामला कोणी जबराम म्हणून हाक मारली तेव्हा किंग खाननं केलं होतं असं रिअॅक्ट. 

मुंबईच्या वांद्र परिसरात अनेक सेलिब्रिटींची घरे आहेत. ज्यात सलमान खान आणि शाहरुख खानचं देखील नाव आहे. शाहरुखच्या घराचं नाव मन्नत असून समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या बंगल्याच्या बाहेर लोक येऊन फोटो काढताना दिसतात. त्याच्याच पुढे एक झोपडपट्टी असून त्याचं नाव गणेश नगर असं आहे. या परिसरात फक्त 100 घरं आहेत असं म्हटलं जातं. त्यातही ती घरं इतकी मोठी आहेत की एका रुममध्ये मोठी लग्जरीअस गाडी आरामत राहिली. इथे राहणारे लोक बॅन्डस्टॅडला येणाऱ्या लोकांना काही ना काही विकत त्यांच घर चालवतात किंवा त्यापैकी काही लोक मोठ्या मोठ्या लोकांच्या घरात काम करतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, बीबीसी न्यूजनं याच गणेश नगरमध्ये राहणाऱ्या काही लोकांशी शाहरुखविषयी काही प्रश्न विचारले. त्यात एक होता की त्यांची आणि शाहरुखची कधी भेट झाली आहे का? तर गणेश नगरमध्ये राहणाऱ्या इब्राहिमनं त्याच्या एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की 'मतदानाच्या वेळी माझी काकू शाहरुख आणि अबरामला भेटली होती. तेव्हा माझ्या काकूनं अबरामला जबराम म्हणून हाक मारली होती.' तेव्हा शाहरुख अबरामला म्हणाला 'बेटा काकूंना सांग तुझं नाव जबराम नाही अबराम आहे.'

हेही वाचा : VIRAL PHOTO : पत्नी, एक्स अन् बहीण सगळ्या एकाच फ्रेममध्ये; ट्रोल्सनी पाडला मीम्सचा पाऊस!

शाहरुख त्याच्या या स्वभावासाठी खूप लोकप्रिय आहे. सगळ्यांच्या मनात जागा करण्याच्या काही खास गोष्टींमध्ये त्याचा हा गुण महत्त्वाचा रोल आहे. तर आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं नेटफ्लिक्सवर जवान प्रदर्शित झाला आहे. तर हा चित्रपट आपल्याला अनकट पाहायला मिळणार आहे. त्यालाच एक्सटेंडड वर्जन असणार आहे. 'पठाण' नंतर 'जवान' आता ओटीटीवर आला आहे. शाहरुखचे चाहते आता त्याच्या डंकी या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ज्या प्रकारे चांगली कमाई केली त्या प्रमाणे 'डंकी' देखील तितकीच कमाई करणार अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे.