शिक्षणासाठी परदेशात असणारी काजोलची मुलगी करतेय असं काम... फोटो व्हायरल

परदेशात शिक्षणासाठी असणाऱ्या काजोलच्या मुलगीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...  

Updated: May 6, 2022, 09:24 AM IST
शिक्षणासाठी परदेशात असणारी काजोलची मुलगी करतेय असं काम... फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि काजोलची लाडकी मुलगी न्यासा देवगण सध्या कमालीची चर्चेत आहे. न्यासा देवगन तिच्या फॅशनमुळे सगळ्यांचं लक्षवेधून घेते. पण आता न्यासा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. शिक्षणासाठी परदेशात असणाऱ्या न्यासाला नुकताचं एक म्यूजिक कॉन्सर्टमध्ये स्पॉट करण्यात आलं. सध्या न्यासाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मित्रांसोबत पार्टी करताना दिसत आहे. 

न्यासा ज्या फोटोंमध्ये दिसत आहे ते 3 मे रोजी लंडनमध्ये झालेल्या दुआ लिपाच्या कॉन्सर्टचे आहेत. कॉन्सर्टचे फोटो शेअर करतान न्यासाचा मित्र ओरहानने कॅप्शनमध्ये, 'आपल्याला जसं हवं आहे, त्याचं प्रकारे संपवू... म्हणा आपण मस्त आहोत...' असं लिहिलं आहे. 

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये न्यासा तिच्या मित्रांसोबत दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या न्यासा तिचे शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये पूर्ण करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या न्यासा आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटीचं शिक्षण घेत आहे.  या अगोदर शालेय शिक्षणाच्या शेवटच्या  तीन वर्षांसाठी सिंगापूरला गेली होती. मार्चमध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर न्यासाचा एक फोटो शेअर केला होता. तो देखील तुफान व्हायरल झाला.