सुंदर असणं अभिनेत्रीला पडलं महागात...ऑडिशनवेळीच दिग्दर्शकाने सांगितलं...

नुसरत भरूचाला ऑस्कर विजेत्या चित्रपटाची संधी चालून आली होती मात्र तिच्या सौंदर्यामुळे तिला ही संधी हातातून सोडावी लागली 

Updated: May 17, 2022, 11:47 AM IST
सुंदर असणं अभिनेत्रीला पडलं महागात...ऑडिशनवेळीच दिग्दर्शकाने सांगितलं... title=

मुंबईः नुसरत भरुचा आज एक अशी अभिनेत्री आहे, जिला आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात स्थान कसे निर्माण करायचे हे माहित आहे.मात्र एक वेळ अशी होती की, सुंदर दिसण्यामुळे तिला सिनेमा नाकारण्यात आला होता.

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट केलेल्या अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षक भरभरून शुभेच्छा देत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, नुसरत भरूचाला ऑस्कर विजेत्या चित्रपटाची संधी चालून आली होती मात्र तिच्या सौंदर्यामुळे तिला ही संधी हातातून सोडावी लागली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nushrratt Bharuccha (@nushrrattbharuccha)

भरुचा 2011 मध्ये आलेल्या 'प्यार का पंचनामा' चित्रपटाने प्रसिद्धीच्या झोतात आला आणि तिचा 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. एका मुलाखतीत नुसरतने सांगितले होते की ती ऑस्कर विजेत्या 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटाचा भाग बनणार होती, पण तिला नकार देण्यात आला.

नुसरत भरुचाने सांगितले की, तिच्या 'सौंदर्या'मुळे तिला या चित्रपटातून नाकारण्यात आले. चित्रपटाच्या निर्मात्यांना तिचा अभिनय खूप आवडला होता. पण ते एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीचं पात्र होतं आणि या पात्रासाठी नुसरत खूप सुंदर होती. त्यामुळे तिला नाकारण्यात आलं आणि नंतर या चित्रपटात तिच्याऐवजी अभिनेत्री फ्रीडा पिंटो हिने ती भूमिका मिळाली. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारही जिंकला होता.

नुसरत भरुचाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिच्या 'जनहित में जरी' या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. या चित्रपटात ती एका कंडोम विक्रेत्या महिलेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाशिवाय ही अभिनेत्री 'सेल्फी' आणि 'राम सेतू'मध्येही दिसणार आहे.

याआधी नुसरत 2021मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छोरी’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट एक भयपट होता, जो स्त्री भ्रूण हत्येवर आधारित होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रेम मिळाले नाही.