मुलगा झाल्यानंतर महिला खासदाराचं प्रियकरासोबत लग्न? फोटो व्हायरल

 महिला खासदाराने प्रियकरासोबत लग्न केल्याच्या चर्चा...

Updated: Nov 20, 2021, 09:42 AM IST
मुलगा झाल्यानंतर महिला खासदाराचं प्रियकरासोबत लग्न? फोटो व्हायरल  title=

मुंबई : पश्चिम बंगालच्या टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी मुलाला जन्म दिल्यापासून त्या अभिनेता यश दासगुप्तासोबत बराच वेळ घालवत आहेत. नुसरत जहाँ यांचं यश दासगुप्तासोबत खरंच लग्न झाले आहे का? हा प्रश्न सतत चाहते उपस्थित करत आहेत. कारण नुसरतने निखिल जैनसोबत केलेला विवाह भारतात बेकायदेशीर असल्याचा दावा केल्यानंतर त्यांनी यश दासगुप्तासोबत काही फोटो पुन्हा एकदा शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही हसताना दिसत आहेत. 

पहिला फोटो पाहिल्यानंतर आता सोशल मीडिया यूजर्स आणि नुसरतच्या चाहत्यांना सत्य जाणून घ्यायचे आहे. नुसरत जाहाँ आणि यशदास दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही जेव्हा नुसरत गरोदर होत्या तेव्हा यशदास कायम त्यांच्यासोबत होते. पण दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा अद्याप केलेले नाही. 

सध्या नुसरत यांनी सोशल मीडियावर यशदाससोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनच्या माध्यमातून  आशीर्वाद मागितले आहेत. सध्या नुसरत यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय आहे फोटो मागचं सत्य 
नुसरत जहाँ यांनी यशसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले - 'आशीर्वाद द्या'. आता नुसरत यांनी आशीर्वाद का मागितले असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वतःचा आणि यश दासगुप्ताच्या फोटोसोबत त्यांनी आणखी दोन फोटो शेअर केले आहेत. फोटो दोघांच्या नवीन चित्रपटाच्या मुहूर्तातील आहेत, ज्याचा उल्लेख नुसरतने हॅशटॅगमध्ये केला आहे.