मुंबई : झगमगत्या विश्वात फक्त चित्रपटांबद्दल नाही तर सर्वात जास्त चर्चा असते ती म्हणजे कोण कोणाला डेट करत आहे. झगमगत्या विश्वात पडद्याच्या मागे नक्की काय सुरू आहे? हे जाणून घेण्यासाठी कलाकारांचे चाहते उत्सुक असतात. आता स्टारकिड्सची प्रेमप्रकरणं देखील सर्वांच्या समोर येत आहे. आता चर्चा रंगत आहे ती म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदाच्या रिलेशशिपबद्दल. नव्या अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
नव्या कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चर्चेत असते. सध्या तिच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा रंगत आहेत. नव्याचं नाव जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरीसोबत जोडण्यात आलं. पण आता कळतं आहे की नव्याच्या मनात मीजान नाही तर बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने घर केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नव्या 'गली बॉय' फेम एमसी शेर म्हणजेचं सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याचं कळत आहे. एवढंच नाही तर त्यांचं नातं फार घट्ट असल्याचं देखील सांगितलं जात आहे. पण नव्या आणि सिद्धांतने त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. पण अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
दरम्यान, एका मुलाखतीत सिद्धांत म्हणाला की, 'मी सिंगल नाही. ती माझ्या आयुष्यातील एक खास व्यक्ती आहे. ती मुलगी बॉलिवूडमधील आहे, पण ती अभिनेत्री नाही...' त्यामुळे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की सिद्धांत आणि नव्या एकमेकांना डेट करत आहेत.