अभिषेक बच्चननं सोडलेली 'पलटन' हा अभिनेता करणार

जे.पी.दत्ता यांच्या पलटन या चित्रपटामध्ये अभिनेता सोनू सुद दिसणार आहे.

Updated: Oct 4, 2017, 11:28 PM IST
अभिषेक बच्चननं सोडलेली 'पलटन' हा अभिनेता करणार title=

मुंबई : जे.पी.दत्ता यांच्या पलटन या चित्रपटामध्ये अभिनेता सोनू सुद दिसणार आहे. अभिषेक बच्चनऐवजी आता पलटन चित्रपटामध्ये सोनू सुद दिसेल. या चित्रपटाचं शूटिंग सुरु व्हायचा काही वेळ आधी अभिषेकनं हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

या चित्रपटाच्या शूटिंगची संपूर्ण तयारी झाली होती. शूटिंगसाठी काही सदस्य लडाखलाही पोहोचले होते. पण अभिषेकनं ऐनवेळी वैयक्तिक कारण सांगून चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला. 

जे.पी.दत्तांच्या चित्रपटामध्ये संधी मिळणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. जे.पी. दत्तांच्या चित्रपटामध्ये काम करायला मिळणं हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे, असं सोनू सुद म्हणालाय. दत्ता यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त सोनूनं ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटमध्ये सोनू, दत्ता, अर्जुन रामपाल, गुरमीत चौधरी आहेत. 

जे.पी.दत्ता यांच्याच रेफ्यूजी या चित्रपटातून अभिषेकनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसंच एलओसी कारगील आणि उमराव जान चित्रपटामध्येही दोघांनी काम केलं होतं. जे.पी. दत्ता यांचा बॉर्डर हा चित्रपट गाजला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. २०१८मध्ये दत्तांचा पलटन हा चित्रपट प्रदर्शित होईल.