साडी नेसून नोरा खेळली क्रिकेट, पाहा व्हिडीओ

गुलाबी साडी नेसून नोरा खेळली क्रिकेट, पहिल्याच बॉलवर सिक्सर, पाहा व्हिडीओ 

Updated: Jul 8, 2022, 04:52 PM IST
साडी नेसून नोरा खेळली क्रिकेट, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : डान्स दीवाने ज्युनियरच्या शूटिंगमध्ये नोरा सध्या व्यस्त आहे. यावेळी सेटवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. स्टेवर नोरा गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसली. गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. तिच्या लूकवर चाहते फिदा आहेत. 

नोरा यावेळी सेटवर क्रिकेट खेळताना दिसली. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 क्रिकेटचा फिव्हर आहेच. हा फिव्हर डान्स दीवाने ज्युनियर्सच्या सेटवर पाहायला मिळाला. नोराने पहिल्याच बॉलवर सिक्सर ठोकला आहे. 

नोराने सेटवरटचा व्हिडीओ शेअर केलाय यामध्ये तिने मितालीचे आभार मानले आहेत. मिताली राजकडून नोरा क्रिकेटच्या टिप्स घेतल्या. त्यानंतर नोराने थेट सिक्सर मारला आहे. नोराने मारलेला बॉल पाहून सगळेच हैराण झाले. सेटवरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नोरा फतेही तिच्या स्टाइलमुळे जास्त चर्चेत असते. नोराला नेहमीच टिप टॉप राहायला आवडतं. तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी तिचे अनेकदा कौतुक केले जाते. मग तो बॉडीकॉन ड्रेस असो, वेस्टर्न आउटफिट असो किंवा भारतीय लूक नोरा प्रत्येक स्टाइलमध्ये खूप सुंदर दिसते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)