डान्स करताना ड्रेसने दिला धोका, ती घटना सांगताना Nora Fatehi आजही रडते

नोराच्या आयुष्यातील असा एक किस्सा सांगणार आहोत. जो स्वत: नोराने एका मुलाखतीत सांगितला आहे.

Updated: Jan 5, 2022, 07:10 PM IST
डान्स करताना ड्रेसने दिला धोका, ती घटना सांगताना Nora Fatehi आजही रडते title=

मुंबई : नोरा फतेही बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. नोरा फतेहीने तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि अप्रतिम नृत्यामुळे अल्पावधीतच चांगली ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत नोरा फतेही अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे. नोरा फतेही तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. यासोबतच तिचा ड्रेसिंग सेन्सही चर्चेत असतो. नोराचे असे अनेक चाहते आहेत, ज्यांना नोरा काय करते? कुठे जाते हे जाणून घ्यायची फार इच्छा असते. त्यामुळे असे लोकं नोराला सोशल मीडियावर फॉलो करतात. नोराही आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्याबद्दल वेळोवेळी अपडेट्स देत असते.

आज आम्ही तुम्हाला नोराच्या आयुष्यातील असा एक किस्सा सांगणार आहोत. जो स्वत: नोराने एका मुलाखतीत सांगितला होता. तो ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

नोराच्या आयुष्यातील ही फार मोठी घटना आहे. बऱ्याच अभिनेत्री त्यांच्या कपड्यांमुळे Oops मोमेंटच्या शिकार होतात. परंतु नोरासोबत घडलेला हा प्रकार त्यापेक्षाही धक्कादायक होता.

अभिनेत्रीने सांगितले की, एका शुटिंगदरम्यान सर्व क्रु मेंबर्सच्या समोर तिचा ड्रेस सुटला आणि तिच्यासोबत मोठी घटना घडली.

नोरा फतेही म्हणाली की डान्स करत असताना अचानक तिच्या कपड्यांनी तिचा विश्वासघात केला आणि ती सर्व क्रू मेंबर्ससमोर आणि कॅमेरासमोर तिचे कपडे सरकले, ज्यामुळे तिच्यावर लाजीरवाणं होण्याची वेळ आली. परंतु पुढे नोरा म्हणाली की, त्यावेळी तिले अभिनेत्री तमन्ना भाटियाने येऊन तिला मदत केली नाहीतर तिची सगळ्यासमोर इज्जत गेली असती.

नारोने या मुलाखतीत ती तमन्ना भाटियाची ऋणी असल्याचे सांगितले.

नोरा फतेही तिच्या कपड्यांमुळे Oops मोमेंटची शिकार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. परंतु या वेळेचा प्रकार हा त्याहून लाजीरवाणा होता.

नोरा फतेही "दिलबर दिलबर" गाण्याने लोकप्रिय झाली आणि या गाण्यातील तिच्या नृत्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. त्याचबरोबर तिने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच तिच्या बादशाहासोबतचे कुसु कुसू हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला चाहते चांगला प्रतिसाद देत आहेत.