मुंबई : जेम्स बॉन्ड सिरीजमधील 25 वा सिनेमा 'नो टाइम टू डाय'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 एप्रिल 2020 रोजी हा सिनेमाघरात रिलीज होणार आहे. या सिनेमाचं ट्रेलर 10 भाषांमध्ये प्रदर्शित झालं आहे. जेम्स बॉन्ड या लोकप्रिय सिरीजमधील ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्शने ट्विट केलं आहे. 'नो टाइम टू डाय' सिनेमाचा ट्रेलर 10 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली. मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 2 एप्रिल रोजी पाच भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होत आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगु, कन्नड सिनेमांत रिलीज होत आहे.
#NoTimeToDie trailer drops tomorrow in 10 languages: #Hindi, #Tamil, #Telugu, #Kannada, #Gujarati, #Marathi, #Punjabi, #Bhojpuri, #Bengali, #Malayalam... 2 April 2020 release in 5 languages: #English, #Hindi, #Tamil, #Telugu, #Kannada. #JamesBond007 #Bond25 #BondJamesBond pic.twitter.com/MWB3vwdHye
— taran adarsh (@taran_adarsh) February 27, 2020
या सिनेमाच्या ट्रेलरने तो मोहोल क्रिएट केला आहे. या सिनेमात डेनियल क्रेग जेम्स बॉन्ड 007 च्या रुपात परत येणार आहे. सिनेमात 51 वर्षांच्या डेनियल क्रेग हे सर्वात जास्त काळ बॉन्डची भूमिका साकारली आहे. डेनियल सर्वात अगोदर 2006 मध्ये आलेल्या 'कसिनो रॉयाल'मध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारत आहे.