सलमान खानच्या सिनेमात होणार साउथ अभिनेत्रींची एंट्री, पाहा लिस्ट

2005 साली आलेल्या 'नो एन्ट्री' या चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

Updated: Jun 21, 2022, 10:21 PM IST
सलमान खानच्या सिनेमात होणार साउथ अभिनेत्रींची एंट्री, पाहा लिस्ट title=

मुंबई : 2005 साली आलेल्या 'नो एन्ट्री' या चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या, लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलचं नाव 'नो एंट्री में एंट्री' असं असणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता नुकतीच या चित्रपटातील स्टारकास्टबाबत मोठी बातमी समोर येत आहे.

विशेष म्हणजे आजकाल साऊथच्या अभिनेत्रींचा बोलबाला आहे. यामध्ये सलमान खानच्या मल्टीस्टारर चित्रपट 'नो एंट्री में एंट्री'मध्ये साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेत्री एंट्री करणार असल्याचं वृत्त आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्ना, समंथा प्रभू रुथ, पूजा हेगडे आणि तमन्ना भाटिया यांसारख्या टॉप अभिनेत्रींना 'नो एन्ट्री 2'चा भागअसण्याची चर्चा आहे.

ताज्या अपडेटनुसार, 'नो एन्ट्री सिक्वेल'मध्ये सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खानची तिहेरी भूमिका असू शकते. या तिन्ही कलाकारांसाठी अनेक अभिनेत्री कास्ट होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या चित्रपटात एक-दोन नव्हे तर 10 नायिका असतील. आता सलमानसोबत कोणत्या अभिनेत्री दिसणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.