दिलजीत दोसांझच्या लग्नाच्या चर्चांमध्ये निशा बानोची पोस्ट, म्हणाली 'मी पत्नी आहे पण...'

Nisha Bano on married to Diljit Dosanjh : दिलजी दोसांझसोबतच्या लग्नाच्या चर्चांमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करत निशा बानोनं मोठा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 23, 2024, 11:06 AM IST
दिलजीत दोसांझच्या लग्नाच्या चर्चांमध्ये निशा बानोची पोस्ट, म्हणाली 'मी पत्नी आहे पण...' title=
(Photo Credit : Social Media)

Nisha Bano on married to Diljit Dosanjh : लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ त्याच्या गाण्यांसाठी आणि स्टाईलसाठी ओळखला जातो. दिलजीतनं त्याच्या अभिनयामुळे देखील चर्चेत राहतो. मात्र, यावेळी त्याचं चर्चेत येण्याचं कारण त्याचं खासगी आयुष्य आहे. खासगी आयुष्यातील कोणती गोष्ट आहे जी त्याच्या चर्चेचा विषय ठरु शकते असं तुम्हाला वाटत असेल तर ते त्याचं लग्न आहे. 

आपल्या सगळ्यांना जे माहितीये ते म्हणजे दिलजीत हा 40 वर्षांचा असून आजही सिंगल आहे. त्यानं त्याची लव्ह लाईफ ही फार खासगी ठेवली आहे आणि त्याला तसंच आवडतं. हेच कारण आहे की त्याच्या गर्लफ्रेंडविषयी कोणालाही काही माहित नाही. या सगळ्यात पुन्हा एकदा दिलजीतच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नाही तर त्याच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर व्हा.रल होत असलेल्या या चर्चांना पाहता, त्यात म्हटलं आहे की दिलजीत दोसांझनं पंजाबी गायक निशा बानोशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात निशा आणि दिलजीत हे वधू-वराचा लूकमध्ये दिसत आहेत. इतकंच नाही तर त्यांनी हा देखील दावा केला की दिलजीतला एक मुलगा देखील आहे. ही चर्चा कियारा अडवाणीच्या एका जुन्या मुलाखतीमुळे सुरु झाली. आता निशानं दिलजीतसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटावर संपूर्ण बच्चन कुटुंबाचा होता आक्षेप! जया यांनी थेट निर्मात्यांना कॉल केला अन्...

निशा बानोनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निशानं दिलजीतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यात ते दोघं वधू-वराच्या लूकमध्ये दिसत आहे. एका फोटोत तर दिलजीतच्या हातात एक मुलगा देखील आहे. ज्यात तो दिलजीतचा मुलगा असल्याचे म्हणत आहे. हे सगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये निशानं त्यांचं लग्न झालं आहे का याचा खुलासा देखील केला आहे. निशानं कॅप्शनमध्ये म्हटलं की "कोणी मला देखील विचारा. त्यांनी मला कोणाची पत्नी बनवलं. ही बातमी फार व्हायरल होतेय आणि लोकं मला फोटो आणि व्हिडीओला टॅग करत आहेत. पंजाबी लोकांना माहित आहे की मी पत्नी आहे पण समीर माहीची. मात्र, बॉलिवूडला ही गोष्ट कोण समजावेल?" 

कियारानं काय केलं होतं वक्तव्य?

खरंतर, ही चर्चा कियारा अडवाणीच्या एका जुन्या मुलाखतीमुळे सुरु झाली आहे. 'गुड न्यूज'च्या प्रमोशन दरम्यान तिनं हिंट दिली की चित्रपटातील चारही कलाकारांमध्ये फक्त ती आहे जिला मुलं नाही. दरम्यान, त्यानंतर दिलजीतनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली आहे.