मुंबईः बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळीला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे जास्त ओळखलं जातं. भारतीय असो किंवा पाश्चात्य पोशाख, निकी प्रत्येक ड्रेस आत्मविश्वासाने परिधान करते. नुकताच निक्कीने तिचा नवा लूक इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे, या लूकमध्ये निक्की इंडो वेस्टर्न आउटफिट्समध्ये दिसत आहे.
मात्र, हा निक्कीचा नवीन व्हिडिओ नसून काही दिवसांपूर्वीचा आहे, ज्यावर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निक्की तांबोळीने हेवी क्रिस्टल वर्क असलेला टील कलरचा लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्याला बोल्ड टच देण्यासाठी अभिनेत्रीने ब्लाउजसोबत केलेल्या प्रयोगाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यादरम्यान निकीने ऑफ-शोल्डर ब्लाउज परिधान केला आहे.
निक्की तांबोळीने सुंदर गार्डनमध्ये हे फोटोशूट केलं आहे. तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी गुलाबी लिप शेड आणि न्यूड मेकअप केला आहे. निक्कीच्या डोळ्यांचा मेकअप तिच्या लुकमध्ये भर घालत आहे.निकीने ऍक्सेसरीजमध्ये फक्त एक ब्रेसलेट आणि अंगठी घातली आहे.
निक्की तांबोळी बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये ती हॉटनेस फ्लॉन्ट करण्यासाठी कॅमेऱ्यासमोर किंचित वाकून पोज देताना दिसत आहे. निक्कीने कॅमेऱ्यासमोर झुकताच सर्वांच्या नजरा क्षणभर थांबल्या होत्या.