निकचे प्रियंकासाठी करोडोंचे गिफ्ट

निकने त्याच्या अल्बमच्या यशानंतर प्रियंकाला मर्सिडीज मेबॅक कार गिफ्ट केली

Updated: Mar 13, 2019, 02:41 PM IST
निकचे प्रियंकासाठी करोडोंचे गिफ्ट title=

नवी दिल्ली : बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्राला पती निक जोनासने करोडोंचं खास गिफ्ट दिलं आहे. निकने प्रियंकाला काळ्या रंगाची मर्सिडीज मेबॅक कार गिफ्ट केली आहे. एवढं मोठं गिफ्ट देण्यामागचं कारणही तितकंच खास आहे. जोनास ब्रदर्सचा अल्बम ‘सकर’ जगभर गाजतोय. बिलबोर्ड हॉट १०० सॉन्गच्या चार्टमध्ये जोनास ब्रदर्सचा हा अल्बम पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या अल्बमच्या यशाबद्दल प्रियंका-निकने सेलिब्रेशन केलं आहे. प्रियंकाने या दोघांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

'बिलबोर्ड डॉट कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, याआधी २००८ मध्ये तीनही जोनस भावांचं 'बर्निग अप' हे गाणं पाचव्या क्रमांकावर पोहचलं होतं. 'सकर' या महिन्याच्या सुरूवातीलाच प्रदर्शित झालं. यात प्रियंकादेखील निकसोबत पाहायला मिळतेय. निकचे भाऊ केविन त्याची पत्नी डॅनियल आणि जो 'गेम ऑफ थ्रोन्स'ची अभिनेत्री पत्नी सोफी टर्नरसह या अल्बममध्ये पाहायला मिळतेय.