पार्टीत Friend चा वाईल्ड अवतार, थेट अभिनेत्रीला कडेवर उचलून घेतलं... पाहा व्हिडीओ

सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधतात आणि आपल्या आयुष्यात काय चालंय, आपले प्लॅन्स काय आहेत? याबद्दल माहिती देतात.

Updated: Mar 13, 2022, 06:02 PM IST
पार्टीत Friend चा वाईल्ड अवतार, थेट अभिनेत्रीला कडेवर उचलून घेतलं... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर बहुतांश सगळेच सेलिब्रिटी सक्रीय असतात. यावरुन ते आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधतात आणि आपल्या आयुष्यात काय चालंय, आपले प्लॅन्स काय आहेत? याबद्दल माहिती देतात. अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझा देखील सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात आणि त्याचं लाखो चहाते आहेत. टीव्हीच्या छोट्या पडद्यावरील या सूना खऱ्या आयुष्यात फारच जास्त बोल्ड आहेत. ज्यामुळे त्या लोखो लाकांच्या मनावर राज्य करतात. सध्या एक सोशल मीडियावर या दोन्ही अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या दोघीही एका पार्टीत नाचताना दिसत आहेत. या दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या दोघीही पार्टीचा मनसोक्त आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

हा व्हिडीओ क्रिस्टल डिसूझाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये क्रिस्टल डिसूजाला निया शर्माने उचलून घेतलं आहे आणि गाण्यावर दोघीही ताल धरताना दिसत आहेत. यासोबतच दोघेही एकमेकांना हाताने शॅम्पेन देताना दिसत आहेत. व्हिडीओ समोर आल्यानंतर, नेटिझन्स कमेंट बॉक्समध्ये अतिशय मनोरंजक प्रतिक्रिया देत आहेत.

निया आणि क्रिस्टल डिसूझा यांची मैत्री

निया आणि क्रिस्टलची मैत्री खूप पूर्वापासूनची आणि घट्ट आहे. या दोघांनी 'बेहेन' या टेलिव्हिजन मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. शोमध्ये क्रिस्टल मोठी बहीण जीविका आणि निया लहान बहिणीच्या भूमिकेत दिसली. तेव्हापासून दोघेही एकमेकांना खऱ्या आयुष्यातही मैत्रीणी झाल्या. हा व्हिडीओ शेअर करत क्रिस्टलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ओ बेहना मेरी'. यासोबतच तिने हार्ट इमोजीही टाकले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हॉटनेससाठी प्रसिद्ध

निया शर्मा तिच्या बोल्ड अभिनयासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे बोल्ड फोटोशूट दररोज व्हायरल होत असतात. यासोबतच क्रिस्टल डिसूझाही तिच्या सौंदर्याच्या जोरावर सर्व चाहत्यांच्या मनावर राज्य करते.