'स्ट्रीट डान्सर ३डी'मधील गाणं पाहण्याआधी चेतावणी नक्की वाचा

'सावधान, जो आप देखने जा रहे हैं वो इतना हॉट है की...'  

Updated: Dec 26, 2019, 06:00 PM IST
'स्ट्रीट डान्सर ३डी'मधील गाणं पाहण्याआधी चेतावणी नक्की वाचा title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक मोठ्या चित्रपटांची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान लवकरच चाहत्यांच्या आणि नृत्यप्रेमींच्या भेटीला येणाऱ्या चित्रपटाने सर्वत्र आपली जादू पसरवली आहे. अर्थात नृत्यप्रेमी म्हटल्यावर तुम्ही ओळखलं असणार की हा चित्रपट 'स्ट्रीट डान्सर ३डी' (Street Dancer 3D) आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर त्यातीत गाण्यांना देखील चाहते डोक्यावर घेताना दिसत आहे. 

अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री नोरा फतेही यांच्या घायाळ आणि बोल्ड अंदाजावर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याच्या सुरवातील चक्क चेतावणी देण्यात आली आहे. 'स्ट्रीट डान्सर ३डी' (Street Dancer 3D) चित्रपटातील 'गर्मी सॉन्ग' प्रदर्शित करण्यात आला. 

गाण्याच्या सुरूवातीलाच चेतावणी दिल्याचं दिसून येत आहे. 'सावधान, जो आप देखने जा रहे हैं वो इतना हॉट है कि उसे नजरअंदाज करना मुश्किल है'. अशी कणखर चेतावाणी देण्यात आलेलं गाणं गायक बादशाह आणि गायिका नेहा कक्करच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आलं आहे.  

सोशल मीडियावर हे गाणं प्रदर्शित होताच काही तासांतच गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले. नोराचं हे गाणं देखील चाहत्यांच्या पसंतीस पडेल यात काही शंकाच नाही. याआधी देखील तिच्या अनेक गाण्यांना चाहत्यांनी पसंती दर्शवली. आता ती 'स्ट्रीट डान्सर ३डी'च्या माध्यमाधून आपल्या नृत्याचा जलवा पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे. 

'स्ट्रीट डान्सर ३ डी' (Street Dancer 3D) चित्रपटामध्ये वरूण आणि नोरा शिवाय अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात ती पाकिस्तानी डान्सरची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

त्याचप्रमाणे 'एबीसीडी'च्या दोन्ही भागातले नृत्य कलाकार आपल्या कौशल्याने चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. २४ जानेवारी २०२० रोजी चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.