टिव्हीएफ प्लेवर शेफ कुणाल कपूरकडून भारतीयांसाठी प्रथमच शाही पदार्थांची रेलचेल

शेफ कुणाल कपूर प्रेक्षकांना देशभरातील शाही किचन्सची ओळख करून देणार आहे.

Updated: May 16, 2019, 06:09 PM IST
टिव्हीएफ प्लेवर शेफ कुणाल कपूरकडून भारतीयांसाठी प्रथमच शाही पदार्थांची रेलचेल  title=

मुंबई : सर्वांनाच शाही थाटात राहायला, शाही थाटात खायलाही आवडतं. राजेरजवाड्यांचं शाही आयुष्य आपल्याला नेहमीच आकर्षित करत असतं. त्यांच्या शाही आयुष्यातील खाद्यसंस्कृतीबाबतही अनेकांना कुतुहल असतं. आपली हीच जादू डिजिटल स्क्रीनवर आणत व्हायरल फिव्हरचा नवीन नॉनफिक्शन शो द रॉयल पॅलेट इन असोसिएशन विथ बेहरूज बिर्यानी हा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या शोमध्ये शेफ कुणाल कपूर आपल्याला भारतातील शाही खाद्यसवयींच्या परंपरेची ओळख करून देणार आहे. रॉयल पॅलेट शो टिव्हीएफप्ले आणि द टाईमलायनर्सवर १६ मे पासून पाहायला मिळणार आहे.

या कार्यक्रमात शेफ कुणाल कपूर प्रेक्षकांना देशभरातील शाही किचन्सची ओळख करून देणार आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, केरळ आणि अशा अनेक राज्यांमधील पदार्थ शाही घराण्यातील व्यक्तींसोबत पाहण्याची संधी मिळणार आहे. शाही पदार्थांमध्ये नाविन्य आणून शाही परिवाराला हे नाविन्य देणे आणि तेही त्यांच्या उपस्थितीत हे या सिरीजचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. 

या रॉयल पॅलेट शो विषयी बोलतांना शेफ कुणाल कपूरने सांगतले की, भारताला मोठा इतिहास आहे आणि आजही अनेक शाही परिवार या परंपरांचे पालन करत आहेत. या शाही खाद्यसवयी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. अशा परंपरागत खाद्यसवयी, त्यांची कहाणी आणि कथा या अतिशय आनंददायी आहेत. भारतीय संस्कृतीचा सातत्याने अभ्यास करणार्‍या व्यक्तींसाठी बेहरोज बिर्यानी आणि टिव्हीएफच्या द रॉयल पॅलेटचा प्रवास हा माझ्यासाठी एक आनंदायी प्रवास आहे. प्रेक्षकही या कार्यक्रमाचा आनंद घेतील आणि त्यांतून त्यांना भारतीय शाही खाद्यसवयींच्या परंपरांची माहिती मिळू शकेल. असं त्याने म्हटलंय.