'लॉर्ड बॉबी'... गरीब मुलांना आर्थिक मदत केल्यानं नेटकरी करतायत बॉबी देओलची स्तुती

Bobby Deol : बॉबी देओचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नेटकरी प्रतिक्रिया देत असून त्याची स्तुती करत आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 22, 2024, 01:49 PM IST
'लॉर्ड बॉबी'... गरीब मुलांना आर्थिक मदत केल्यानं नेटकरी करतायत बॉबी देओलची स्तुती title=
(Photo Credit : Social Media)

Bobby Deol : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर त्याच्या अ‍ॅनिमल या चित्रपटाची आजही चांगलीच चर्चा आहे. बॉबी हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच बॉबीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बॉबीनं केलेल्या कृत्याची नेटकरी स्तुती करत आहेत. 

बॉबीचा हा व्हिडीओ फिल्मी ग्यान या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. बॉबीचा हा व्हिडीओ मुंबईच्या एका रेस्टॉरंटमधील आहे. यात बॉबी बाहेर येतो आणि तिथे दोन गरीब मुलं असतात. त्यांना बॉबी 500-500 रुपये देतो. त्यानंतर त्यांच्यासोबत तो फोटो देखील काढतो. बॉबीनं त्यांच्यासोबत फोटो काढल्यानंतर ती त्याच्याशी गप्पा मारु लागते. त्यानंतर बॉबीची नेटकरी स्तुती करु लागले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉबीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, खऱ्या आयुष्यात बॉबी हा लॉर्ड आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, बॉबीचं मन हे फार मोठं आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, बॉबी हा फार इमोशन्ल आहे. त्याच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे. 

बॉबीनं त्याच्या करिअरमध्ये चांगलेच चढ उतार पाहिले आहेत. करिअरच्या सुरुवातीला त्याला खूप यश मिळालं त्यानंतर अनेक ऑफर्स मिळू लागल्या. त्यानंतर बॉबीच्या करिअरमध्ये असा एक काळ आला जिथे त्याला काम मिळत नव्हतं. त्यानंतर त्याला चांगल्या भूमिका मिळाल्या आणि मग त्यानं ओटीटीवर देखील काम केलं. त्याची 'आश्रम' ही सीरिज चांगलीच गाजली आणि त्यामुळे बॉबी देओलला त्याचा अभिनय दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली. त्याला त्यातही यश मिळालं...

हेही वाचा : 'सापाचं विष की कोकेन... तुला काय हवं?' एल्विश यादवचा मित्रांसोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

बॉबीच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच तमिळ चित्रपट 'कंगुवा: ए माइटी वैलिएंट सागा' मध्ये दिसणार आहे. त्यातील त्याचा लूक देखील समोर आला आहे. या चित्रपटात सुर्या आणि दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय त्याच्याकडे 'हरि हर वीरा मल्लू' हा तेलगू चित्रपट देखील आहे. यात तो पवन कल्याण यांच्यासोबत दिसणार आहे. तर दुसरीकडे तो 'आश्रम' च्या पुढच्या भागाची तयारी करत आहे.