#MeToo ...म्हणून 'सेक्रेड गेम्स'चा सिक्वल कठीणच

'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज लोकप्रियतेच्या परमोच्च शिखरावर पोहोचली होती. पण...

Updated: Oct 14, 2018, 07:52 AM IST
#MeToo  ...म्हणून 'सेक्रेड गेम्स'चा सिक्वल कठीणच title=

मंबई: #MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारांच्या बाबतीत आणि गैरवर्तणूकीच्या प्रसंगांच्या बाबतीत वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. या चळवळीची झळ फक्त कलाविश्वातच नव्हे तर इतरही क्षेत्रांमध्ये बसल्याचं पाहायला मिळालं. तुलनेने कलाविश्वातील प्रसंगांचं प्रमाण मात्र जास्त ठरलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजच्या लेखकावरही लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. 

१७ वर्षांपूर्वीच्या एका प्रसंगाविषयी  वाच्यता करत त्या महिलेने वरुणवर आरोप केले होते. 

नाटकाच्या तालमीचं निमित्त सांगत त्याने आपल्यावर अत्याचार केल्याचं तिचं म्हणणं होतं. वरुणने मात्र तिने लावलेले हे सर्व आरोप फेटाळत या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 

पण, वरुणच्या या प्रयत्नांना यश आलेलं दिसत नाही. कारण, कलाविश्वात सध्या सुरु असणाऱ्या चर्चांनुसार 'सेक्रेड गेम्स' या प्रचंड गाजलेल्या वेब सीरिजचा दुसरा भाग सध्या लांबणीवर गेला आहे. 

फँटमचा वाद आणि वरुणवर झालेले आरोप पाहता नेटफ्लिक्सकडून संबंधितांना एक पत्रक पाठवण्यात आलं असून त्यात 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या पर्वाविषयी सुरु असणारं काम ताबडतोब थांबवण्याची विचारणा करण्यात आली आहे. 

'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज लोकप्रियतेच्या परमोच्च शिखरावर पोहोचली होती. पण, आता मात्र या वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात होण्यापूर्वीच एक संकट ओढावल्याचं कळत आहे. 

सूत्रांचा हवाला देत 'डेक्कन क्रोनिकल'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमातून एकतर वरुणचं नाव वगळण्यात येईल किंवा मग ही सीरिजची कल्पनाच वगळावी लागेल, असं काहीजणांचं म्हणणं आहे. तेव्हा आता या सीरिजविषयी नेमकी काय आणि कोणती अधिकृत घोषणा करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.