नेटफ्लिक्सचं नवं पर्व लवकरच, मराठीसह 17 नव्या सिनेमांची घोषणा

 आशियाई मार्केट काबीज करण्यासाठी नेटफ्लिक्स सज्ज झालंय.

Updated: Nov 10, 2018, 08:50 AM IST
नेटफ्लिक्सचं नवं पर्व लवकरच, मराठीसह 17 नव्या सिनेमांची घोषणा  title=

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात 2018 हे वर्ष वेब सिरिज साठी ओळखलं जातंय. या वर्षात खूप चांगल्या वेब सिरिज प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. सिनेमा आणि मालिकांना एक सक्षम पर्याय म्हणून याकडे पाहिलं जातंय. या सर्वात नेटफ्लिक्सच्या वेबसिरीज सर्वाधिक चर्चेत राहिल्या. सेक्रेड गेम्सची उत्सुकता तर अजूनही राहिलीचं आहे. आता तरं नेटफ्लिक्सचं नवं पर्व लवकरच रसिकांच्या भेटीला येतयं. बाहुबली-१च्या प्रिक्वेलसह अनेक नव्या वेबसिरीज आणि सिनेमांची घोषणा नेटफ्लिक्सने केलीय.

नव्या सिनेमांची घोषणा 

१७ नवीन सिनेमांची घोषणा नेटफ्लिक्सने केली असून त्यापैकी नऊ प्रोजेक्ट भारतात आहेत. यांत मराठी सिनेमांचाही समावेश आहे. बाहुबली- बीफोर द बिगिनिंग सीरीज स्वरूपात भेटीला येणार आहे. शिवगामी आणि तिच्या साम्राज्याच्या उदयाची कथा असेल.

आशियाई मार्केट काबीज

 बाहुबली बिगनिंगच्या 50 वर्षे आधीचा आणि बाहुबली कन्क्लूझनच्या ७५ वर्षापूर्वीचा इतिहास या नव्या सीरीजमध्ये मांडला जाणार आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता राहुल बोस, अतुल कुलकर्णी यांच्याही यांत भूमिका असणार आहेत.

याशिवाय अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा आणि माधुरी दीक्षित नेटफ्लिक्ससाठी सिनेमाची निर्मिती करणार आहेत.

एकूणच काय तर आशियाई मार्केट काबीज करण्यासाठी नेटफ्लिक्स सज्ज झालंय.