नववर्षाच्या रात्री नेहा कक्करचं पतीसोबत असं काय घडलं की, स्टेजवरच रडू लागली सिंगर

 नववर्षानिमित्त नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Updated: Jan 1, 2022, 07:09 PM IST
नववर्षाच्या रात्री नेहा कक्करचं पतीसोबत असं काय घडलं की, स्टेजवरच रडू लागली सिंगर title=

मुंबई : नववर्षानिमित्त नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 2022 मध्ये पाऊल ठेवत ती पती रोहनप्रीत सिंगला किती मिस करत आहे. हे या पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. नेहा कक्करने या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, रोहनप्रीत आणि ती दोघंही नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकत्र नााही आहेत. यामुळे जेव्हा ती स्टेजवर परफॉर्म करत होती तेव्हा ती रडायला लागली. तिने एक मोठी पोस्ट लिहिली आहे.

नेहा कक्करने रोहनप्रीत सिंगसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं, 'मला तुझी आठवण येतेयं, हा फोटो गेल्या वर्षी क्लिक केला होता आणि काल रात्री आम्ही एकत्र नव्हतो. कारण रोहनप्रीत काश्मीरमध्ये आणि मी गोव्यात परफॉर्म करत होतो. 

मी काल रात्री 12 वाजता मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण माझ्या परफॉर्मन्समुळे ते होऊ शकलं नाही त्यामुळे मी स्टेजवरच भावूक झाले आणि रडू लागले. आणि मी आजवर रोहूला याबद्दल सांगितलं नाही कारण मी याआधीही एकदा स्टेजवर रडले होते आणि या गोष्टीची मलाच खूप लाज वाटते. 

खूप भावूक झाल्यामुळे मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही कारण रोहू माझ्यासोबत नव्हता आणि मला त्याला घट्ट मिठी मारून नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. पण वर्षाच्या शेवटच्या दिवशी आम्ही दोघं काम करत होतो आणि लोकांचं मनोरंजन करत होतो याचा मला खरोखर आनंद आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बेबी मी आज तुला भेटाण्याचीअजून वाट नाही पाहू शकत.. लव यू माय ड्रीम हसबंड! सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि माझ्या #NeHearts मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.'