हा राजबिंडा मुलगा आहे kiara advani चा लाईफ पार्टनर?

एका प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या लव्ह लाईफची जोरदार चर्चा आहे. 

Updated: Jan 1, 2022, 06:45 PM IST
हा राजबिंडा मुलगा आहे kiara advani चा लाईफ पार्टनर? title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहे जे त्यांच्या केमिस्ट्रीमुळे विशेष चर्चेत असतात. सेलिब्रिटी कपलच्या स्टाईलपासून ते त्यांच्यातील बॉण्डिंगपर्यंत सगळ्या गोष्टींची चर्चा पाहायला मिळते. दीपिका -रणवीर, आलिया - रणबीर, विकी-कतरिनानंतर आणखी एका प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या लव्ह लाईफची जोरदार चर्चा आहे. 

बॉलिवूडचं नवं कपल अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या अफेअरची सध्या जोरदार चर्छा आहे. शेरशाह या चित्रपटात दोघेही एकत्र झळकले होते. दोघांच्या जोडीला खूप प्रेम मिळालें.

वैयक्तिक आयुष्यात सुद्धा दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. कियाराला अनेकदा सिद्धार्थच्या घरी स्पॉट करण्यात आलं आहे. आता नववर्षाचं स्वागत करण्यासाठी ते मालदिवला गेले आहेत. नुकतचं त्यांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा दोघांच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

एअरपोर्ट लूकमध्ये कियारा आडवाणी खूपच सुंदर दिसत होती. जर्सी परिधान करून ती विमानतळावर पोहोचली. त्याचवेळी सिद्धार्थने ​एअरपोर्टवरून जाताना ग्रीन शर्ट आणि ब्लॅक ट्राउजर परिधान केली होती. 

दोघेही एकत्र मीडियासमोर आपल्या नात्याची उघडपणे कबुली देत असल्याचं दिसून येतं. दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकावे अशी चाहत्यांची इच्छा आहे.

दोघांनी ही मीडियासमोर येत फोटो काढले. आणि मालदीवला ते रवाना झाले.