गरोदरपणात नेहा धुपियाला कोरोनाची लागण, जमिनीवर झोपून काढले दिवस

मी फार घाबरली होते. मला वेगळे राहवं लागलं होतं.

Updated: Aug 13, 2021, 10:51 AM IST
 गरोदरपणात नेहा धुपियाला कोरोनाची लागण,  जमिनीवर झोपून काढले दिवस title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे, पण तुम्हाला माहित आहे का की जेव्हा ती दुसऱ्यांदा गर्भवती झाली तेव्हा तिला कोरोनाची  लागण झाली होती. यावेळी आठवून अभिनेत्रीने सांगितले की, ती दिवसभर मास्क घालत असे आणि मुलगी मेहरपासून दूर झोपत होती, जमिनीवर  झोपत ती स्वत:ला  घरातील मेंबर्सपासून दूर ठेवत होती. मे 2018 मध्ये नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीसोबत सात फेरे घेतले. लग्नाच्या काही महिन्यांनंतर अभिनेत्रीने पहिली मुलगी  मेहेरला जन्म दिला.

नेहासोबत नक्की काय घडलं?

एका मुलाखतीत नेहा म्हणाली, "मला कोविड -19 ची सौम्य लक्षणे होती, पण मी फार घाबरली होते. मला वेगळे राहवं लागलं होतं. स्वत:ला सर्वांपासून दूर ठेवावे  लागलं होतं. मला कोविड -19 बद्दल कळले तेव्हा मी स्वतःला वेगळे करण्याचा विचार करत होते. मला वाटले की घरातील सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.  अशा परिस्थितीत, माझे कर्मचारी, पती अंगद आणि मेहेर यांच्यासह माझ्यासाठी देखील ही खूप कठीण वेळ होती. मी गर्भवती असताना आणि बाळाची गुड न्यूज  समोर येऊन फक्त  24 दिवस झाले होते, तेही जेव्हा दिल्लीत कोरोनाचे रुग्ण सतत वाढत होते.

नेहा पुढे म्हणाली की, मी दिवसभर मास्क घालायला सुरुवात केली. मी मेहेरपासून दूर जमिनीवर झोपायचे. मी गरोदर होती, कारण या काळात तुम्हाला एका स्थितीत  झोपावे लागते, अशा स्थितीत मला जमिनीवर झोपलेले पाहून मेहेर म्हणायचे की बेडवर खूप जागा आहे, तू इथे झोप. मी समजावून सांगायचे, पण तिच्या जवळ जाणं  टाळायचे. आम्ही सर्वजण भीतीला सामोरे जात होतो आणि खबरदारी घेत होतो.  

नेहा धुपिया दुसऱ्यांदा होणार आई 

 नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई होणार आहे, बेबी बंप दाखवून तिने आनंदाची बातमी शेअर केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

18 जुलै रोजी नेहा आणि अंगदने दुसऱ्या बाळाविषयी सगळ्यांना सांगितलं. दोघांनी खास फोटो शेअर केले होते. नेहा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. संपूर्ण कुटुंब  एकत्र दिसले. फोटो शेअर करताना नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले, "नवीन होम प्रॉडक्शन लवकरच येत आहे. वाहेगुरू मेहर करे." यासह, तिने सांगितले की हे कॅप्शन  निवडण्यासाठी तिला दोन दिवस लागले.