रणबीरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहिल्यानंतर आई नीतू कपूर भावूक, म्हणाल्या 'आज ऋषी कपूर...'

नितू कपूर यांनी नुकताच रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहिला. यानंतर त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.   

शिवराज यादव | Updated: Dec 2, 2023, 11:48 AM IST
रणबीरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहिल्यानंतर आई नीतू कपूर भावूक, म्हणाल्या 'आज ऋषी कपूर...' title=

अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट अखेर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला रणबीर कपूरची आई नितू कपूर, पत्नी आलिया भट यांनी हजेरी लावली होती. चित्रट पाहिल्यानंतर नितू कपूर यांनी इंस्टाग्रामला स्टोरी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये त्यांनी रणबीर कपूरचा चित्रपटातील फोटो शेअर केला असून, आज ऋषीजी हवे होते असं लिहिलं आहे. 

नितू कपूर यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं एप्रिल 2020 मध्ये निधन झालं. मुंबईत या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगसाठी आलिया भट, शाहीन भट, महेश भट आणि सोनिया राजदान यांनी हजेरी लावली. 

चित्रपट ऑनलाइन लीक 

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डीने केलं आहे, कबीर सिंगनंतर हा त्याचा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे. रणबीर कपूरचा अॅक्शन अवतार आणि बॉबी देओलची नकारात्मक भूमिका यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. हा चित्रपट लांबीत मोठा असून, सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान चित्रपट रिलीज होताच लीक झाला आहे. पायरसीचा फटका 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला बसलेला असून ऑनलाइन लीक झाला आहे.

टेलिग्राम प्लॅटफॉर्म आणि इतर पायरेटेड वेबसाईट्सवर हा चित्रपट डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे चक्क एचडी क्वालिटीमध्ये हा चित्रपट उपलब्ध आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठा फटका बसू शकतो. 

अ‍ॅनिमल चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ट्रेलरवरुन हा चित्रपट मुलगा आणि बापाच्या नात्यावर भाष्य करत असल्याचं दिसत आहे. वडिलांना आपला अभिमान वाटावा यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकणारा मुलगा यात दाखवण्यात आला आहे. अनिल कपूरने बापाची तर रणबीर कपूरने मुलाची भूमिका निभावली आहे. रश्मिका रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉबी देओल प्रमुख व्हिलन आहे, ज्याच्या मागावर रणबीर कपूर आहे. 

दरम्यान बॉक्स ऑफिसवर अ‍ॅनिमलसह विकी कौशलचा सॅम बहादूर चित्रपट रिलीज झाला आहे. अ‍ॅनिमलने पहिल्याच दिवशी 61 कोटींची कमाई केली असून सुपरहिट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. नीतू कपूर सध्या सनी कौशल आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्यासह श्रीनाथ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत. याआधी जुग जुग जियो चित्रपटात त्या दिसल्या होत्या.