'डान्स दिवाने'च्या स्टेजवर आला 'हा' लोकप्रिय कलाकार; त्याच्यासोबत Neetu Kapoor चा डान्स झाला व्हायरल, पाहा व्हिडीओ

सध्या रणबीर आणि आलियाच्या गुड न्यूजमुळे तर चाहते त्यांचा पाठलाग करणं सोडत नाही आहेत.

Updated: Jul 14, 2022, 03:56 PM IST
'डान्स दिवाने'च्या स्टेजवर आला 'हा' लोकप्रिय कलाकार; त्याच्यासोबत Neetu Kapoor चा डान्स झाला व्हायरल, पाहा व्हिडीओ title=

मुंबईः सध्या बॉलीवूडमध्ये तैमूरसारखीच चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री नीतू कपूर यांंची. गेल्या दोन वर्षांत त्यांना चांगलीच मोकळीक मिळाल्याने स्वतःसाठी त्या भलताच मोकळा वेळ काढत आहेत. शॉपिंगपासून ते अगदी हॉटेलमध्ये डिनरला जाण्यापासून नीतू कपूर तर प्रत्येक ठिकाणी स्पॉट होत आहेत. सध्या रणबीर आणि आलियाच्या गुड न्यूजमुळे तर चाहते त्यांचा पाठलाग करणं सोडत नाही आहेत. त्या जिथे जातात तिथे त्यांच्या पाठीपाठी फोटोग्राफर्सची चंगळ लागलेली असते. नुकत्याच त्या आपल्या एका शो मध्ये डान्स करताना दिसल्या. 

नीतू कपूर यांचा नुकताच 'जुग जुग जिओ' हा सिनेमा रिलिज झाला आहे. तो सिनेमा सध्या भलताच फेमस झाला असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं करोडो रूपये कमावले आहेत. आता सध्या नीतू कपूर या त्यांच्या 'डान्स दिवाने ज्यूनिअर' या रिएलिटी शोमध्ये जज म्हणून आहेत. तेव्हा आलिया आणि रणबीरच्या गुडन्यूजनंतर आलिया आणि रणबीर या दोघांना त्याही 'डान्स दिवाने'च्या स्टेजवर आणतील का, अशी अपेक्षा चाहत्यांनाही होती. ही चाहत्यांची अपेक्षा खुद्द नीतू कपूर यांनी पुर्ण केली आहे. आलिया तिच्या शुटिंगमुळे लंडनमध्ये गेली होती तर रणबीर स्पेनमध्ये. त्यामुळे शुटिंगला गेलेल्या आलिया रणबीरला मात्र नीतू कपूरही भेटू शकल्या नव्हत्या. नुकतेच दोघेही भारतात परतले आहेत. त्यातून रणबीर पाठोपाठ आलेल्या आलियाला एअरपॉर्टवर रिसिव्ह करायलाही स्वतः रणबीर गेला होता तेव्हा त्यांनी मारलेल्या मिठीचीही विशेष चर्चा झाली आणि त्या दोघांचे प्रेम पाहून चाहतेही घायाळ झाले. 

लवकरच रणबीरचा 'समशेरा' हा चित्रपट रिलिज होणार आहे. त्यातील गाणीही रिलिज आहेत. त्यातील 'जी हजूर' हे गाणंही भलतेच लोकप्रिय झाले आहे. याच गाण्यावर थिरकण्यासाठी नीतू कपूर आणि रणबीर कपूर 'डान्स दिवाने'च्या स्टेजवर नाचले, ज्याचा व्हिडिओ भलताच व्हायरल होतो आहे. यात नीतू कपूर आपल्या मुलासह 'जी हजूर' म्हणत गाण्याच्या डान्स स्टेप्सवर नाचत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बऱ्याच दिवसांनी नीतू कपूर आपल्या मुलाला रणबीरला भेटल्या आणि त्यामुळे नाचतानाही त्या आपला आनंद लपवू शकल्या नाहीत. लवकरच रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' आणि 'शमशेरा' सिनेमा रिलिज होणार आहे. तेव्हा आपल्या या भेटीला व्यक्त करण्यासाठी रणबीरसोबतचा डान्स व्हिडिओ नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला 'शमशेरा' असं कॅप्शन दिलं आहे.