कंगना राणौतचा इंदिरा गांधी अवतार, कुणी बनवलं हीला 'गांधी' वादी

कंगनाचा Emergency लूक पाहिलात का? कोणी केलं अभिनेत्रीचं इतकं ट्रांसफॉर्मेशन? हा मेकअप आर्टिस्ट आहे तरी कोण? जाणून घ्या

Updated: Jul 14, 2022, 07:58 PM IST
कंगना राणौतचा इंदिरा गांधी अवतार, कुणी बनवलं हीला 'गांधी' वादी title=

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) हीच्या आगामी 'इमर्जन्सी' (Emergency)  चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या फर्स्ट लुकमध्य़े कंगणा राणौत हुबेहुब माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यासारखी दिसतेय. सोशल मीडियावर तिच्य़ा या लुकची प्रशंसाही होतेय आणि तिच्यावर टीकाही केली जात आहे. या सर्वांत मोठ्या पडद्यावर कंगणाला हुबेहुब इंदिरा गांधी बनवणारा तो मेकअप आर्टीस्ट आहे तरी कोण, अशी चर्चा रंगलीय. चला जाणून घेऊया कोण आहे तो मेकअप आर्टिस्ट. 

कोण आहे मेकअप आर्टीस्ट? 

'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटात कंगणाला इंदिरा गांधीच्या भूमिकेत पाहून सर्वांनाच आश्चर्य धक्का बसलाय. अगदी हुबेहुब कंगणाला इंदिरा गांधी बनवणारा तो  प्रसिद्ध प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्ट डेव्हिड मालिनॉस्की (David malinowski) आहे. डेव्हिडला त्याच्या उत्कृष्ट कामासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

डेव्हिडला 2017 मध्ये डार्केस्ट आवर या चित्रपटासाठी बेस्ट मेकअप आणि हेअरस्टाइलिंग कॅटेगरीत ऑस्कर मिळाला होता. याशिवाय, डेव्हिडचं त्याच्या वर्ल्ड वॉर झेड आणि द बॅटमॅनमधील कामाबद्दल खूप कौतुक करण्यात आलं होत.  

 कंगनाची इन्स्टा स्टोरी
दरम्यान काही दिवसांपुर्वींच कंगनाने इन्स्टा स्टोरीवर डेव्हिडसोबतचे काही फोटोही शेअर केले होते. ज्यामध्ये तो कंगणाचा (Kangana Ranaut) मेकअप करताना दिसत होता. विशेष म्हणजे माजी पंतप्रधानांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे कंगनाच्या लुकवर खुप बारकाईने काम करण्यात आले आहे. तसेच 'इमर्जन्सी' चित्रपटात कंगणा कुठेही दिसत नाहीये. तिच्या बॉडीतून इंदिरा गांधी बोलत असल्याचा भास होतोय. यामुळे प्रत्येकजण तिच्या या लुकची प्रशंसा करतोय.  

टीझरमध्ये काय? 
अभिनेत्री कंगना राणावत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटातून भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीची भुमिका साकारते आहे. इंदिरा गांधींच्या रूपात तिचा पहिला-वहिला लूक समोर आला आहे. तसेच टीझरमध्य़े कंगना राणौत इंदिरा गांधींच्या लुकमध्ये अगदी सेम टू सेम त्यांच्यासारखीच दिसते आहे. त्यांच्यासारखीच हेअर स्टाईल आणि साडी घालून इंदिरा गांधीची हूबेहूब नक्कल तिने केली.या चित्रपटाचे दिग्दर्शनही कंगनाचेच आहे. हा आगामी चित्रपट आहे 2023 मध्ये रिलीज होणार आहे.