नितू कपूरचा मुलगी रिद्धिमा आणि मनीष मल्होत्रासोबत डान्स; व्हिडिओ व्हायरल

 बॉलिवूड चित्रपट 'जुग जुग जिओ' सध्या खूप चर्चेत आहे. 

Updated: Jun 11, 2022, 03:03 PM IST
नितू कपूरचा मुलगी रिद्धिमा आणि मनीष मल्होत्रासोबत डान्स; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड चित्रपट 'जुग जुग जिओ' सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूपच धमाकेदार आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील नच पंजाबन हे गाणे सध्या चर्चेत आहे आणि त्यावर अनेक रिल्स व्हायरल होत आहेत. आता अभिनेत्री नीतू कपूरने स्वतः तिची मुलगी रिद्धिमा आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत या गाण्यावर डान्स केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांनाही त्याचा डान्स खूप आवडला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नीतू कपूर तिची मुलगी रिद्धिमा कपूर आणि मनीष मल्होत्रासोबत नच पंजाबन गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्री आणि तिच्या मुलीच्या डान्स स्टेप्स पाहून चाहतेही खूप एन्जॉय करत आहेत आणि तिच्या आगामी 'जुग जुग जिओ' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओमध्ये नीतू कपूर काळ्या रंगाची पँट आणि सैल शर्ट घातलेली दिसत आहे. तर दुसरीकडे रिद्धिमाने ग्रे कलरचा शिमर टॉप आणि ब्लॅक प्लाझो पँट घातली आहे. मनीष मल्होत्रा ​​नेहमीप्रमाणेच त्याच्या लूकमध्ये खूपच मस्त दिसत आहे. त्याने काळी जीन्स आणि काळा टी-शर्ट घातला आहे. 

 'जुग जुग जिओ' हा करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस धर्मामध्ये बनलेला एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. जुग जुग जियो हा चित्रपट राज मेहता दिग्दर्शित करत आहेत. ज्यामध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर वरुण धवनच्या आई-वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर कियारा अडवाणी या चित्रपटात तिच्या सूनेच्या भूमिकेत आहे.  हा चित्रपट 24 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नीतू कपूर बऱ्याच दिवसांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. मात्र, ती एका टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसली असून तिच्या पुनरागमनाबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत.