IND vs AFG Head To Head: भारताचा पराभव करून अफगाणिस्तान रचणार इतिहास? की रोहितसेना पडणार भारी?

IND vs AFG Pitch Weather: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचं पारडं जड असेल? पावसाची आणि खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल? पाहा रिपोर्ट

सौरभ तळेकर | Updated: Jun 19, 2024, 11:31 PM IST
IND vs AFG Head To Head: भारताचा पराभव करून अफगाणिस्तान रचणार इतिहास? की रोहितसेना पडणार भारी? title=
India vs Afghanistan Head To Head and Pitch Weather

India vs Afghanistan : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा 43 वा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ सुपर 8 मधील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात (IND vs AFG Head To Head) आतापर्यंत 8 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 7 सामन्यात विजय मिळवलाय. तर अफगाणिस्तानने अद्याप या फॉरमॅटमध्ये भारताला पराभूत केलेले नाही. एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे आता अफगाणिस्तान पहिल्यांदाच टीम इंडियाचा पराभव करण्याचा निश्चय करून मैदानात उतरेल. तर भारत विजय मिळवून सुपर 8 मध्ये विजयाचा नारळ फोडेल.

खेळपट्टी कशी (Pitch Condition)

केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर आत्तापर्यंत 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला येथे फायदा झाल्याचं पहायला मिळालंय. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 18 वेळा विजय मिळवला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने केवळ 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय रोहित शर्मा घेऊ शकतो.

पाऊस खोडा घालणार? (IND vs AFG Weather Condition)

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे. Accuweather च्या मते, स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची 44 टक्के शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणात का होईना सामना होणार आहे. उद्याच्या सामन्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहिल.

दरम्यान, विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. गेल्या तीन सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे आता विराटची रनमशिन चालणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं ठरेल.

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. 

टी-20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तानचा संघ: रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.