Drug Case : NCB कार्यालयात Ananya Pandey सोबत नेमकं काय घडलं?

जवळपास दोन तास ती एनसीबी कार्यालयात होती.

Updated: Oct 22, 2021, 07:08 AM IST
Drug Case : NCB कार्यालयात  Ananya Pandey सोबत नेमकं काय घडलं?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : क्रूझ शिप ड्रग्ज केस प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर आता एनसीबीनं आणखी जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईअंतर्गत आर्यन खानच्या चॅटमधून अनन्य़ा पांडेचं नाव समोर आल्यामुळे तिलाही एनसीबीनं समन्स बजावलं आहे. (Ananya Pandey ARYAN KHAN NCB DRUGS CASE)

NCB च्या समन्सनंतर अनन्या तिचे वडील अभिनेता चंकी पांडे यांच्यासह चौकशीसाठी पोहोचली. 21 ऑक्टोबरला दुपारी अनन्या एनसीबी कार्यालयात पोहोचली, ज्यानंतर तिला शुक्रवारी म्हणजेच 22 ऑक्टोबरलाही तिथं हजेरी लावावी लागणार आहे. 

दरम्यान, अनन्या गुरुवारी जवळपास दोन तासांसाठी एनसीबी कार्यालयात होती. जिथं तिची चौकशी करण्यात आली. चौकशीच्या नव्या सत्रातून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अनन्याची चौकशी समीर वानखेडे यांनी केली.यावेळी तपास अधिकारी वीवी सिंहसुद्धा उपस्थित होते. शिवाय एक महिला अधिकारीही तेथे उपस्थित होत्या.

अनन्याला एनसीबीनं खालील प्रश्न विचारल्याची सूत्रांची माहिती 
तू आर्यन खानला ओळखतेस का? 
आर्यन खानला ड्रग्ज घेताना तू पाहिलंस का? 
आर्यन खाननं ते ड्ग्ज कुठून घेतले होते? 
तूसुद्धा आर्य़नसोबत ड्ग्ज घेतले होतेस का? 
आर्यन केव्हापासून ड्रग्ज घेतोय आणि कोणत्या प्रकारचे ड्रग्ज घेतोय? 
त्याला ड्रग्ज पुरवठा कोण करत होतं?
ड्रग्ज घेतले गेले ती तारीख तुला लक्षात आहे का?
ड्रग्ज घेणं बेकायदेशीर आहे तुला माहितीये?

आपल्याला आलेलं समन्स पाहता अनन्यानं तिचे आगामी प्रोजेक्ट, जाहिरातीचं चित्रीकरणही तूर्तास रद्द केल्याची माहिती हाती आली आहे. 

30 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खानची न्यायालयीन कोठडी वाढली 
गुरुवारी आर्यन खानला कायद्यानं आणखी एक हादरा दिला. विशेष एनसीबी न्यायालयानं अरबाजसह आर्यन आणि ताब्यात असणाऱ्या इतर आठ जणांच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंतची वाढ केली.