गॉर्जियस लूक आणि हातात वाईनचा ग्लास, धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडकडून फोटो शेअर

दक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Updated: Oct 21, 2021, 10:20 PM IST
गॉर्जियस लूक आणि हातात वाईनचा ग्लास, धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडकडून फोटो शेअर title=

मुंबई :  दक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी केवळ 'कांचना' चित्रपटासाठीच नव्हे तर पवन सिंगसोबत 'करंट' या म्युझिक व्हिडिओसाठीही ओळखली जाते. 'करंट' हे तिचं हिट गाणं होतं. ती तिच्या प्रोजेक्ट्सवर तसंच सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती वारंवार स्वतःशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशा परिस्थितीत तिने तिचे काही फोटो पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील शेअर केले आहेत, ज्यात ती वाइनच्या ग्लाससोबत दिसत आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली अभिनेत्री राय लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या पोशाखात पाहून लोक कमेंटचा वर्षाव करत आहेत. चाहते तिच्या सौंदर्याची आणि स्टाईलची जोरदार स्तुती करत आहेत. तिच्या लक्झरी स्टाईलला सोशल मीडिया युजर्सने खूप पसंती दिली आहे.

जिथे एकीकडे चाहते राय लक्ष्मीच्या रूप आणि सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. तर दुसरीकडे,  एमएस धोनी आणि त्यांच्या नातेसंबंधावर काही युजर्स टोमणे मारतायेत. एका युजर्सने लिहिलं की, 'धोनी भाईला भेटा. एक काळ असा होता की, राय लक्ष्मी धोनीवर आपलं जीव ओवाळून टाकायची. दोघंही ऐकमेकांच्या खूप प्रेमात होते. त्यांची लव्हस्टोरी आयपीएल दरम्यान सुरू झाली.

त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र होत्या. जेव्हा ती चेन्नई सुपर किंग्ज संघाची ब्रँड अॅम्बेसेडर होती तेव्हा धोनी आणि राय लक्ष्मीच्या लव्हस्टोरीच्या जोरदार चर्चा होत्या. या दरम्यान ती भारतीय फलंदाजाला भेटली होती आणि या दरम्यान एका मुलाखतीत म्हणाली होती की, जर धोनीने येऊन तिला प्रपोज केलं तर ती त्याच्याशी लग्न करेल.

मात्र, नंतर दोघांचं ब्रेकअप झालं आणि अभिनेत्री रायने तेव्हाही सांगितलं होतं की, तिने धोनीसोबतच्या नात्याला डाग किंवा निशाणी मानू लागली आहे. जो खूप दिवसांपर्यंत हटणारर नाही. जर आपण तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो तर ती शेवटची पवन सिंहच्या हिंदी गाण्यामध्ये दिसली होती. हे गाणं पवन आणि पायल देव यांनी गायलं होते.