नयनतारा-विघ्नेश अडकणार चौकशीच्या फेऱ्यात? जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

नयनतारा विग्नेश आई-वडील बनताच सरकारने दिले 'हे' मोठे आदेश, चौकशीच्या फेऱ्यात अडकणार? 

Updated: Oct 10, 2022, 09:12 PM IST
नयनतारा-विघ्नेश अडकणार चौकशीच्या फेऱ्यात? जाणून घ्या संपुर्ण प्रकरण  title=

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार नयनतारा (Nayanthara)आणि तिचा पती विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) हे आई-वडील झाले आहेत. या जोडप्याने जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे. विघ्नेश आणि नयनतारानं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. मात्र आता नयनतारा-विघ्नेश वादात अडकले आहेत. सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. 

नयनतारा (nayanthara) आणि विघ्नेश शिवन  (Vignesh Shivan)  नुकतेच सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नाच्या अवघ्या 4 महिन्यांत दोघेही पालक बनले आहेत. दोघेही पालक बनल्यानंतर आता वादात सापडले आहेत. नेमका हा वाद काय आहे, तो जाणून घेऊयात.  

 

प्रसिद्ध अभिनेत्री बनली आई,जुळ्या मुलांना दिला जन्म

 

चौकशीचे आदेश 
तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एमए सुब्रमण्यम यांना पत्रकार परिषदेत नयनतारा (nayanthara) संदर्भातला प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले. ते म्हणाले, 'सरोगसी हाच मोठा वादाचा विषय आहे. परंतु, कायदा 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 36 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कुटुंबाच्या मान्यतेने सरोगसी करण्याची परवानगी देतो. वैद्यकीय सेवा संचालनालयाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. नयनतारा (nayanthara)  आणि विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) या दोघांची चौकशी होणार असल्याने त्यांना मोठा धक्का बसणार आहे. 

पोस्टद्वारे चाहत्यांना दिली खुशखबर
नयनतारा (nayanthara) लग्नाच्या चार महिन्यांनंतरच आई झाली आहे. नयनताराने (nayanthara)  जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. याबाबत अभिनेत्रीचा पती विघ्नेश शिवनने (vignesh shivan) मुलांसोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. फोटो शेअर करत विघ्नेश शिवनने (vignesh shivan)  लिहिले की, 'नयन आणि मी आज अम्मा आणि अप्पा बनलो आहोत. आम्हाला जुळे मुलगे झाले आहेत. आमच्या सर्वांच्या प्रार्थना, पूर्वजांच्या आशीर्वादाने आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रूपाने मिळाल्या आहेत. आम्हाला तुमच्या सर्व प्रार्थनांची गरज आहे. उईर (uyir) आणि उलगम (ulagam) असे या बाळांचे नाव असल्याची माहिती त्याने दिली होती.