पत्नी आणि मुलांना Nawazuddin Siddiqui नं मध्यरात्री दाखवला घरा बाहेरचा रस्ता, Video शेअर करत, म्हणाली...

Nawazuddin Siddiqui च्या पत्नीचा आणखी एक व्हिडीओ समोर... व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकीवरविषयी केला मोठा खुलासा... आलिया सिद्दीकीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे तर काही नेटकऱ्यांनी नवाजुद्दीनला ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना फक्त एकच बाजू माहित आहे.

Updated: Mar 4, 2023, 04:33 PM IST
पत्नी आणि मुलांना Nawazuddin Siddiqui नं मध्यरात्री दाखवला घरा बाहेरचा रस्ता, Video शेअर करत, म्हणाली... title=

Nawazuddin Siddiqui Thrown His Wife Aaliya Siddiqui and his Childrens Out Form House : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन चर्चेत असण्याचे कारण त्याच्या घरात सध्या सुरु असलेले अनेक वाद. नवाजुद्दीनच्या घरातील अनेक गोष्टींचा खुलासा त्याची पत्नी आलिया सतत करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्धिकी (Mehrunisa Siddiqui) यांनी आलियाविरोधात पोलिसात तक्रार देखील केली होती. आलिया बऱ्याच दिवसांपासून नवाजुद्दीनच्या मुंबईतील घरात राहत होती. तिच्या आजुबाजूला 24 तास बॉडीगार्ड असायचे. आलिया तिच्या मुलांसोबत घराच्या लिव्हिंग रूममध्ये राहत होती. दरम्यान आता व्हिडीओ समोर आला आहे की तिला आणि तिच्या मुलांना नवाजुद्दीननं मध्यरात्री घराबाहेर काढल्याचा खुलासा केला. (Nawazuddin Siddiqui Wife Aaliya Siddiqui) 

आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आलिया रस्त्यावर असल्याचे दिसत आहे. मात्र, आलिया ही यावेळी एकटी नाही तर तिच्यासोबत तिची मुलं देखील आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत तिची मुलगी शोरा रडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की हा व्हिडीओ कुठला आहे तर हा व्हिडीओ नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बंगल्याच्या गेटबाहेरचा आहे. नवाजुद्दीननं पत्नी आलिया आणि दोन्ही मुलांना भररात्री घराच्या बाहेर काढलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ शेअर करत आलियानं कॅप्शन दिलं की '40 दिवस एका घरात राहिल्यानंतर मला वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. तिथून परत आल्यानंतर मला दिसलं की नवाजनं घराच्या गेटवर गार्ड्स ठेवले आणि मला आणि माझ्या मुलांना घरात घेतले नाही. आम्हाला त्यानं असंच रस्त्यावर सोडलं. माझ्या मुलीलातर विश्वास होत नाही आहे की तिचे वडील तिच्यासोबत असं काही करू शकतात. ती रस्त्यावर उभी राहून रडू लागली आहे. '

हेही वाचा : बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी Allu Arjun सज्ज!

दरम्यान, दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ त्याला ट्रोल करत आहे. त्यानं सोशल मीडियावर ट्विटरवर ट्रेंड होणाऱ्या गोष्टींचा एक स्क्रीन शॉर्ट शेअर केला आहे. हा स्क्रीन शॉर्ट शेअर करत शमास म्हणाला, "पैसे न देता ट्वीटरवर ट्रेंड झाला. हा महान अॅक्टर अभिनयासाठी ट्रेंड व्हायला हवा होता. याचं सत्य सर्वांसमोर येऊन हा घरी बसणार आहे.” हे पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.