गेल्या 23 वर्षांपासून नवाज कोणाच्या प्रतीक्षेत? प्रसिद्धी, पैसा असूनही आता हे काय म्हणतोय...

एक काळ असा होता की तुटपुंज्या मानधनावर नवाजला भूमिका करावी  लागत होती. आणि बऱ्याचदा ते मानधनही प्रॉडक्शन हाऊसकडून दिलं जात नसे. असाच एक अनुभव नवाजने शेअर केला आहे. 

Updated: Apr 26, 2022, 03:40 PM IST
गेल्या 23 वर्षांपासून नवाज कोणाच्या प्रतीक्षेत? प्रसिद्धी, पैसा असूनही आता हे काय म्हणतोय... title=

मुंबईः नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये आज नवाजचं नाव मोठं असलं तरी इथेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे.

अनेक छोट्या-छोट्या भूमिका करत तो इंडस्ट्रीमध्ये टिकून राहिला. अनेक चांगल्या-वाईट अनुभवांपासून शिकत त्याने इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली.

नवाजने आतापर्यंत अनेक भूमिका केल्या. ती प्रत्येक भूमिका सर्वांच्याच स्मरणात राहील अशी आहे. त्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची दाद मिळाली आणि कौतुकही झालं..आज अभिनयाच्याच जोरावर नवाजने नावासह संपत्तीही कमावली आहे.

आज नवाज कोट्यधीश असला तरी एक काळ असा होता की तुटपुंज्या मानधनावर नवाजला छोट्या-छोट्या भूमिका कराव्या  लागत होत्या, आणि बऱ्याचदा ते मानधनही प्रॉडक्शन हाऊसकडून दिलं जात नसे. असाच एक अनुभव नवाजने शेअर केला आहे. 

नवाजने 1999मध्ये अभिनेता मनोज वाजपेयीसोबत 'शूल' या सिनेमात छोटीशी भूमिका केली होती. या सिनेमासाठी नवाजला 2500 रुपये मानधन देण्याचं ठरलं होतं, मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतरही प्रॉडक्शन हाऊसकडून मानधन देण्यात आलं नाही.

अनेक वेळा प्रॉडक्शन हाऊसला चकरा मारूनही मानधन न मिळाल्याने नवाज एक शक्कल लढवली आणि पैस वसूल केले. जवळपास 6 ते 7 महिने चकरा मारूनही पैसे मिळाले नाही. मात्र, त्यांच्या ऑफिसमध्ये मला जेवण करायला मिळत असे. त्यामुळे मी लंच टाईममध्ये मी ऑफिसला जात असे, असं नवाजनं सांगितलं.

ऑफिसमध्ये ते मला जेवणं केलं का असं  विचारायचे, तेव्हा मी त्यांना 'हो' म्हणून सांगायचो, तेव्हा त्यांनी सांगितलं की, तुला पैसे तर मिळणार नाही, मात्र तू इथे जेवण करू शकतोस. त्यामुळे एक ते दीड महिना मी प्रॉडक्शन ऑफिसमध्ये  जेवण करून मी माझे 2500 रुपये वसूल केले.