मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांचं मंगळवारी रात्री ८.३० वाजल्याच्या सुमारास निधन झालंय. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं श्रीराम लागू हे त्यांच्या राहत्या घरीच कोसळले होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नी दीपा लागू आणि मुलगा आहे. डॉ. लागू यांचा मुलगा गुरुवारी सकाळी अमेरिकेतून पुण्यात पोहचेल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील, असं दीपा लागू यांच्यावतीनं सांगितलं गेलंय. गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. डॉ. लागू यांच्या निधनानं कलाक्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होतेय.
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलीय तर राष्ट्रवादीचे खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही 'सूर्य पाहिलेला माणूस' काळाच्या पडद्याआड गेला असं म्हणत श्रीराम लागू यांना आदरांजली व्यक्त केलीय.
वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/2KjzKkia80
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 17, 2019
....म्हणून स्वत:ला चोर म्हणायचे डॉ. लागू
ज्येष्ठ अभिनेते डॉ श्रीराम लागू यांचे निधन झाले. सामाजिक भान असणारे अभिनेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या रुपाने 'सूर्य पाहिलेला माणूस' काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/Dg5MudO4kN
— Shriniwas Patil (@ShriPatilKarad) December 17, 2019
ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन झाले. पुरोगामी चळवळीबद्दलची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. रंगभूमी,चित्रपट या क्षेत्रात त्यांचे अतुलनिय योगदान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) December 17, 2019
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील अभिनयाच्या तेजस्वी पर्वाचा आज अंत झाला, रंगभूमीचा'नटसम्राट' हरपला. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.#DrShreeramLagoo pic.twitter.com/NlUz1PO7mJ
— Praful Patel (@praful_patel) December 17, 2019
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची भावना भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केलीय. तर आपण एका हरहुन्नरी व्यक्तीमत्वाला गमावून बसल्याचं भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय.
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. पिंजरा, सामना यांसारखे चित्रपट आणि नटसम्राट, हिमालयाची सावली यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट-नाट्यसृष्टी जीवंत केली. माझी डॉ लागू यांना विनम्र श्रद्धांजली.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 17, 2019
गेली अनेक दशके सिनेमा, नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी रसिकजनांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय दुःखद आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 17, 2019
My tributes to all time great artist Shreeram Lagoo. We have lost a versatile personality. A unique theatre actor dominated silver screen and created impact. He was social activists simultaneously.
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) December 17, 2019
With a very heavy heart, our nation bids adieu to the legend rightly considered as one of pioneers of the Indian theatre, Dr. Shriram Lagoo. The man of many faces, his eternal legacy will continue reign the hearts of millions! Rest in peace, Natasamrat..!!! pic.twitter.com/6mMhf0r4e9
— Vinod Tawde (@TawdeVinod) December 17, 2019
भाजप नेत्यांसोबतच महाराष्ट्र काँग्रेसनंही डॉ. श्रीराम लागू यांना आदरांजली व्यक्त केलीय.
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि नाट्य सृष्टितील समृद्ध अभिनेते व दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पुरोगामी सामाजिक कारणांसाठी आवाज उठवणाऱ्या नटसम्राटास भावपूर्ण श्रद्धांजली. #श्रीरामलागू #ShriramLagoo pic.twitter.com/vuWDobFQkb
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 17, 2019
नटसम्राटांच्या जाण्याने आज कदाचित मृत्यूही ओशाळला असेल. पण चाहत्यांच्या मनातील सिंहासनावर ते कायम आरूढ राहतील.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.#श्रीरामलागू #ShriramLagoo pic.twitter.com/qL7YbzVN4O— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 17, 2019
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनामुळे चित्रपट आणि नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड गेले आहेत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/RkBRSyO13a
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 17, 2019
डॉ. श्रीराम लागू, नटसम्राट, दिग्गज अष्टपैलू कलाकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते - त्यांच्या जाण्याने एका पर्वाचा अंत झाला. नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील एवढी मोठी पोकळी भरून येणे शक्य नाही. मराठी रंगमंच तर पोरका झाला.
भावपूर्ण श्रद्धांजली! #श्रीरामलागू#ShriramLagoo pic.twitter.com/XVULVPWJCf— Sachin Sawant (@sachin_inc) December 17, 2019
श्रीराम लागू दीर्घकाळापासून आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू होते.
१६ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्मलेल्या डॉ. लागू यांनी मराठी सिनेसृष्टीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. ते एक ईएनटी सर्जन (ENT Surgeon) होते. डॉ. लागू यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखलं जातं.