पुन्हा एकदा रंगमंचावर 'नटसम्राट'ची गर्जना

दिवाळीच्या मुहुर्तावर नाटकाचा शुभारंभ होतोय

Updated: Oct 18, 2018, 05:29 PM IST
पुन्हा एकदा रंगमंचावर 'नटसम्राट'ची गर्जना

मुंबई : मराठी रंगभूमीवरील अजरामर कलाकृती 'नटसम्राट' पुन्हा एकदा नव्या ढंगात रंगभूमीवर येतंय. 'झी मराठी' प्रस्तुत आणि हृषिकेश जोशीचं दिग्दर्शन असलेल्या 'नटसम्राट'मध्ये मोहन जोशी 'नटसम्राटा'च्या भूमिकेत दिसणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर झी मराठीनं या नवीन नाटकाची घोषणा केलीय. 

Image result for mohan joshi
मोहन जोशी

रोहिणी हट्टंगडी, सुशील इनामदार, भक्ती देसाई, श्वेता मेंहदळे, अभिजीत झुंझारराव यांच्याही या नाटकात प्रमुख भूमिका असतील. दिवाळीच्या मुहुर्तावर नाटकाचा शुभारंभ होतोय.